दोषी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी
देऊळगाव राजा : प्रतिनिधी
तालुक्यातील देऊळगाव मही येथील मे. सागर अँग्रो इंडस्ट्रीज येथे सुरु असलेल्या शासकीय हमीभाव कापुस खरेदी केंद्रावर व्यापारी आणि राजकीय पुढारी यांच्याशी आर्थिक संगनमत करून त्यांच्या कापुस वाहनांना रांगेत उभे न करता ताबडतोब टोकन देऊन कापुस वाहने खरेदीचा प्रकार करणाऱ्या दोषीं कर्मचारी यांचेवर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करावी या मागणीसाठी स्वाभिमानीच्या युवा आघाडी जिल्हाद्यक्ष सतिष मोरे यांच्या नेतृत्वात कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती महेश देशमुख यांना घेराव घालण्यात आला.सर्व सामान्य शेतकऱ्यांना कापसाची शासकीय हमीभावाप्रमाणे विक्री करता यावी म्हणून महाराष्ट्र शासनाने पणन महासंघाचे माध्यमातून देऊळगाव मही येथील मे. सागर अँग्रो इंडस्ट्रीज येथे कापुस खरेदी केंद्र सुरु केले आहे. खुल्या बाजारात कापसाचे भाव कमी असल्याने व शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर कापसाला जास्त भाव मिळत असल्यामुळे सदर कापुस खरेदी केंद्रावर कापुस विक्रीसाठी वाहनांची गर्दी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या कापुस वाहनासह तीन- चार मुक्काम करावे लावत असून सदर वाहनाचे जास्तीचे भाडे भरावे लागत असल्याने शेतकऱ्यांना जास्तीचा आर्थिक भुरदण्ड सोसावा लावत आहे.
परंतु देऊळगाव मही येथील मे. सागर अँग्रो इंडस्ट्रीज येथे सुरु असलेल्या शासकीय हमीभाव कापुस खरेदी केंद्रावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी , कर्मचारी व कापुस खरेदी केंद्र चालक यांनी व्यापारी आणि राजकीय पुढारी यांच्याशी आर्थिक संगनमत करुन त्यांच्या कापुस वाहनांना रांगेत न लावता ताबडतोब टोकन देऊन कापुस वाहनांची खरेदी करण्याचा गैरप्रकार नियमित केल्या जात आहे. अशीच बाब दि. २५ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली असून देऊलळगांवमही येथील राजकीय व्यक्तींचे कापसाचे वाहनांना रांगेत न लावता ताबडतोब टोकन देऊन कापुस खरेदी केंद्रामध्ये वाहने खाली करण्याचा प्रकार स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी समोर आणला होता. कृषी उत्पन्न बाजार समितीने सदर वाहनाचा पंचनामा केला असून त्यामध्ये राजकीय पदाधिकारी यांच्या सात ट्रॅकटर वाहनांना रांगेत न लावता डायरेक्ट टोकन दिल्याची बाब समोर आली आहे. सदर गैरप्रकारात दोषींवर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सतिष विष्णु मोरे, मधुकर शिंगणे, गणेश शिंगणे, राजेंद्र शिंगणे, रामनारायण मोरे, रामकिसन शिंदे, राजेंद्र बोरकर, गणेश सिरसाट, शिवाजी सिरसाट, गजानन काबुकडे, हरी चव्हाण यासह अन्य शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महेश देशमुख यांना घेराव घालुन दोषींवर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करावी अशी मागणी केली. नसता आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.


No comments:
Post a Comment