Wednesday, January 30, 2019

साप्ताहिक मातृतीर्थ एक्सप्रेस आॅनलाईन व्हिवर्स लाखाचे पार....


 
  स्रेह व प्रेमाने ५ महीन्यात टप्पा गाठला
 देऊळगाव राजा :  अशरफ पटेल
      २२ आॅक्टोबर २०१५ विजयादश्मीच्या पावन मुहूर्तावर श्री बालाजी महाराजांच्या पवित्र भूमित साप्ताहिक मातृतीर्थ एक्सप्रेसच्या माध्यामातून आम्ही वृत्त पत्रात आणि पत्रकारीतेच्या क्षेत्रात भरारी घेण्याचा आत्मविश्वास पूर्वक प्रयत्न केला. बुडती हे जन ! न देखवे डोळा! येतो कळवळा म्हणवूनी !! हा संत तुकोबांचा वारसा पुरेपुर अंगिकारुन आम्ही समाजाभिमुख, डोळस आणि सकारात्मक पत्रकारीतेसाठी गेले वर्षभर अखंडपणे लेखणी चालवली. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक बाबींवर विधायक अर्थाने प्रकाश टाकतानाच त्याचबरोबर समाजातल्या असंख्य खुपणाºया बाबींचीही परखडपणे, निर्भिडपणे उचित असा समाचार घेतला. सामाजिक एक्या कायम ठेवण्या बरोबरच समाजाचा सुसंस्कृतपणा अबाधीत ठेवण्यासाठी साप्ताहिक मातृतीर्थ एक्सप्रेस ची लेखणी सदैव सतेज ठेवली. तसेच दि. २५ आॅगस्ट २०१८ पासून साप्ताहिक मातृतीर्थ एक्सपे्रस ने विकासाची झेप घेत शोसल मिडीया वर एक पाऊल पूढे टाकत आॅनलाईन वर रोजच्या घडामोडी आपल्या वाचकांसाठी मोबाईल वर उपलब्ध करुन दिला फक्त ५ महीन्यात व्हिवर्स लाखाचे पार....
           राजकारणातल्या, समाजकारणातल्या करंटेपणाचे सत्य सातत्याने समाजपटलावर ठेवण्याचे काम आमच्यातल्या सच्या पत्रकारीतेने निर्भयपणे केले. साप्ताहिक मातृतीर्थ एक्सप्रेसची भरारी वर्षभर घेत असताना आम्हाला काही कटू, मन विषपणा करणारे अनुभवी आले. मात्र आम्ही डगमगलो नाही किंवा खचलोही नाही कारण एकीकडे असे विपरित अनुभव येत असतानाच आमच्यावर निखळ प्रेम करणाºया सुजान वाचक रसिकांचे उदंड प्रेम आणि सफलाम समाजनिर्मितीसाठी झिजलेल्या आमच्या लेखणीचे सामर्थ्य आम्हाला अनंत कोटीचा आनंद देणारे होते. हाच प्रामाणिक पत्रकारीतेचा आनंद आमच्या लेखणीतून दिवसागणिक समृद्ध करीत होता. आज बरोबर एक वर्षाचा हा प्रवास एखाद्या ध्येयवेड्या भरारीगत आम्ही पूर्ण केला. पत्रकारीतेतली हीच सच्चाई घेऊन हाच परखडपणा घेऊन हा निर्भिडपणा घेऊन त्याच बरोबर डोळस आणि सकारात्मक दृष्टी घेऊन आम्ही नव्या समाज जीवनाचा वेघ घेण्यासाठी विकास झेप घेत आहोत. भरारीतला तोच आत्मविश्वास, तोच उत्सहा, तिच उर्जा आमच्या या पुढच्या विकास झेप घेत असताना नक्कीच असेल साप्ताहिक मातृतीर्थ एक्सप्रेस च्या मागील वर्षातल्या भरारी, झेप, लक्ष यशाचे ला आमच्या विवेकी वाचक रसिकांनी, जाहिरातदारांनी आमच्या लेखणीवर प्रंचड पे्रम करणाºया सर्व चाहत्यांनी जो आधार दिला, जे बळ दिले त्याचे मोजमाप चरेतर कुठेच करता येणार नाही म्हणूनच या सर्वांच्या रुणात राहून आणि या सर्वांची भरभक्कमअशी साथ घेऊन साप्ताहिक मातृतीर्थ एक्सप्रेसची ही विकास झेप मार्गक्रमीत करणार आहोत. आमच्या मायबाप  वाचक रसिकांचे अमाप पे्रम आम्हाला या पुढील प्रवासात सादैव ऊर्जा देत राहीला हा विश्वास आम्हला आहे. यात शंका नाही....फक्त ५ महीन्यात साप्ताहिक मातृतीर्थ एक्सपे्रस व्हिवर्स लाखाचे पार....

1 comment: