Wednesday, January 30, 2019

जैन मुनी मुदीत सागर गिरणार पर्वता वरुन बेपत्ता

 
  देऊळगावराजा सकल जैन समाजाच्या वतीने तहसीलदारास निवेदन
  गुजरातच्या जुनागड शहरात वंदनेसाठी गेले होते
 देऊळगांवराजा :  प्रतिनिधी 
      आचार्य सुनिल सागरजी यांचे शिष्य मुनी मुदीत सागरजी महाराज हे मागील एक आठवड्या पासून जुनागड गुजरात येथील गिरणार पर्वता वर वंदने साठी गेले होते. दि.२३ जानेवारी रोजी शेवटची वंदना झाली होती.  तेव्हा पासून अचानक पणे बेपत्ता झाले. त्यांची शोध मोहिम ड्रोन कॅमेरे द्वारे सुरु आहे. त्यांचे त्वरीत शोध लावण्यात यावे यासाठी देऊळगावराजा सकल जैन समाजाच्या वतीने तहसीलदारास निवेदन देण्यात आले.
         दि.२३ जानेवारी रोजी जैन मुनी मुदीत सागर जुनागड गुजरात येथील गिरणार पर्वता वर वंदने साठी गेले होते. तेव्हा पासून जैन मुनि आश्रमात परत न आल्याने शिष्यां मध्ये चर्चा झाली. त्या दरम्याण अनेक शंका कुशंका नी आश्रम व परिसरात चिंत्तेचे वातवरण पसरले होते तर हिंस्र पशुनी किंवा घातपाताने मुनिचा शिकार तर झाले नाही ना असे तर्क वितर्क लावण्यात येत आहे. ही बाब समस्त भारतभर जैन समाजात पसरल्याने त्यांची चिंता अधिक वाढली आहे. आज रोजीही शोध न लागल्याने त्यांचे त्वरीत शोध लावण्यात यावे यासाठी देऊळगावराजा सकल जैन समाजाच्या वतीने तहसीलदार दिपक बाजड यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर योगेश खडकपूरकर, निशिकांत जिंतूरकर, चैतनलाल जैन, सतिष खवडे, सन्मती जैन, सुजित डोणगावकर, विनोद जैन, सुधिर जैन, कमलेश अक्करबोटे, ऋषभ जैन व इतर असंख्य जैन समाज महिला व पुरुष व तरूणांच्या स्वाक्षºया आहे.  
    

No comments:

Post a Comment