Wednesday, May 31, 2023

राज्यात आदर्श ठरलेल्या कराड येथील शाळेला भेट

 


 देऊळगांव राजा : (प्रतिनिधी)

        शैक्षणिक दृष्ट्या राज्यात आदर्श ठरलेल्या तसेच सर्वाधिक पटसंख्या असलेल्या नगरपालिकेच्या शाळेला स्थानिक नगरपालिकेचे प्रशासनाधिकारी यूनुस खान यांनी भेट दिली. याप्रसंगी अनेक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक श्री कोळी यांच्याशी त्यांनी शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा केली.     

             संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक गुणवत्तेचा मॉडेल ठरलेल्या तसेच महाराष्ट्रात सर्वाधिक पटसंख्या असलेली कराड येथील नगरपरिषद शाळा क्रमांक ३ ला आज नगरपालिकेचे प्रभारी प्रशासन अधिकारी यांनी भेट दिली.याप्रसंगी विद्यार्थ्यांसाठी शाळेत असलेली शैक्षणिक साहित्य,संगणक वर्ग, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी असलेले सुसज्ज पुस्तकालयाचे दालन,विद्यार्थ्यांसाठी आरओ पिण्याचे पाणी प्लॅन्ट, सोलार विद्युत संच आदींची पाहणी केली. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शाळेत करावयाला लागणाऱ्या उपाययोजना बद्दल अनेक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांच्या समवेत चर्चा केली.यावेळी आय एस ओ नामांकन प्राप्त शाळेचे मुख्याध्यापक तथा महाराष्ट्र नगरपरिषद शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अर्जुनराव कोळी सर यांच्या समवेत शैक्षणिक विषयावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी व्हॉइस ऑफ मिडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर , मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाचे माजी तालुका अध्यक्ष तथा पत्रकार अशरफ पटेल, न.प उर्दू शाळेचे सेवा जेष्ठ शिक्षक अब्दुल हई, शेख हनिफ भाई यांची उपस्थिती होती.

Friday, March 10, 2023

अर्थसंकल्पात सरकारला शिवस्मारकाचा विसर - राजेश इंगळे


 देऊळगाव राजा : 

     अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे मोठा गाजावाजा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलपूजन केले. मात्र प्रत्येक्षात कामाला अजूनही सुरुवात झालेली नाही. शिवाय राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर केलेल्या अर्थसंकल्पात शिव स्मारकाबाबत कोणतीही तरतूद करण्यात आलेली नसल्याने अर्थसंकल्पात सरकारला शिवस्मारकाचा विसर पडला असल्याचा आरोप शिवसंग्राम चे राजेश इंगळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

     सदर प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहि  आहे की,अर्थसंकल्पी अधिवेशनात नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्यामध्ये सर्व घटकांना न्याय देत भरीव आर्थिक तरतूद करण्यात आलीआहे. मात्र गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाबाबत साधा ब्र शब्द देखील सरकारने काढला नाही.शिवसंग्राम हा मित्र पक्ष म्हणून महायुतीत सामील आहे. मागील महायुती सरकारच्या काळात शिवसंग्राम चे  अध्यक्ष स्वर्गीय विनायकराव मेटे हे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष होते. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक व्हावे म्हणून आ.स्वर्गीय विनायकराव मेटे यांनी आयुष्यभर लढा दिला.त्यावेळी तत्कालीन सरकारने शिवस्मारकाच्या पहिल्या टप्प्यातल्या बांधकामासाठी 2600 कोटी रुपयाची तरतूत केली होती. मात्र अजूनही प्रत्येक्षात बांधकामास सुरुवात झालेली नाही. मागील अर्थसंकल्पात मंजूर केलेल्या निधीची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप पर्यंत झाली नाही परिणामी सहा वर्षे उलटूनही शिव स्मारकाच्या पायाभरणीला प्रत्यक्षात सुरुवात झाली नाही, शिवाय मागील अर्थसंकल्पात मंजूर निधीतुन अद्याप पर्यंत शिवस्मारका च्या कामाला सुरुवात झाली नाही. तसेच कालच्या अर्थसंकल्पात शिवस्मारकासाठी वाढीव तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे अर्थ संकल्पात सरकारला शिवस्मारकाचा विसर पडला की काय? असा प्रश्न शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. शिवसंग्रामचे कार्यकर्ते स्वर्गीय विनायकराव मेटे यांचा लढा व्यर्थ जाऊ देणार नाही. सरकारने शिवस्मारकाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी,असे पत्र शिवसंग्रामचे राजेश इंगळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे.

मातृतीर्थ मतदार संघाच्या प्रशासकीय इमारतीला ३० कोटी मंजुर




 


  आ. डॉ. राजेंद्र शिंगणे साहेब यांच्या प्रयत्नांना यश,

  देऊळगावराजा : प्रतिनिधी 

मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदार संघातील देऊळगावराजा व सिंदखेडराजा  तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयांना स्वतची इमारत नसल्याने वेगवेगळ्या ठिकाणी ही कार्यालये कार्यरत आहे.  ही बाब लक्षात घेऊन या मतदार संघाचे आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांनी या दोन्ही तालुक्यात प्रशासकीय इमारत व्हावी यासाठी शासन दरबारी मागणी केली होती. माहविकास आघाडीचे सरकार असतांना माजी अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी केली होती. त्यावेळीच हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात होता. परंतु आठ महिन्या अगोदर सत्तांतरण झाले आणि ही मागणी मागे पडली. त्यानंतर पुन्हा तीन महिण्यागोदर या संदर्•ाात शासनाकडे मागणी करण्यात आली. व शासनाने ती मान्य केली असून या दोन्ही तालुक्यातील प्रशासकीय इमारतीसाठी जवळपास 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या इमारतीचे बांधकाम झाल्यावर बरीच शासकीय कार्यालय एका छताखाली येऊन मतदार संघातील शासकीय कामानिमित्त येणाºया जनतेला सोयीचे होणार आहे.



Thursday, March 9, 2023

महाराष्ट्र राज्या ही संतांची भूमि आहे : दिलीप शेजूळकर

 


 राष्ट्रसंत श्री सेनाजी महाराज यांची ८३३ वी जयंती उत्साहात साजरी 

देऊळगावराजा : (प्रतिनिधी)  

         महाराष्ट्र राज्य ही संतांची भूमि आहे. या भूमिवर संत, महात्मा व थोर पुरुष होऊन गेले कित्येक संतांचा जन्म हा वेगवेगळ्या राज्यातील आहे. पण कर्मभूमि मात्र महाराष्ट्र आहे. असेच एक राष्ट्रसंत म्हणजे संत श्री सेनाजी महाराज राज्यसतील नव्हे तर संपूर्ण देशभरातील नाभिक समाज श्री संत सेनाजी महाराजांना पुजतो असे प्रतिपदान दिलीप शेजूळकर यांनी केली आहे.  

       दि.८ मार्च रोजी स्थानिक राष्ट्रसंत श्री सेनाजी महाराज समाजिक सभागृह येथे राष्ट्रसंत श्री सेनाजी महाराज यांची ८३३ वी जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते माल्यर्पण करुन ८ मार्च महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या हस्ते पुजन व महाआरती करण्यात आली. याप्रसंगी विठ्ठल जाधव, ज्ञानेश्वर वाघ, शाहीर कंकाळ, पत्रकार सुरज गुप्ता यांनी मोलाचे समाजाला मार्गदर्शन केले. पुढे बोलतांना शेजूळकर म्हणाले की, राष्ट्रसंत श्री सेनाजी महाराज यांचे व त्यांच्या प्रगल्भ विचारांचे नमन करावे मिरवणूक  तथा गाजा वाजा न करता साध्या पद्धतीने सेनाजी महाराज यांना अभिवादन करावे तसेच त्यांच्या परिवर्तनवादी विचारांना अमलात आणून प्रत्येक घरात त्यांचे विचार पोहचविण्याचे कार्य करणार असे संकल्प केले. राष्ट्रसंत श्री सेनाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्व नाभिक सामजाने आपले प्रतिष्ठाण बंद ठेवले होते.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार  सुनिल शेजुळकर यांनी केले. यावेळी नाभिक बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday, January 14, 2023

आदर्श समाज घडविण्यासाठी शिक्षण घ्या


 आमेना अजीज हायस्कूलच्या स्नेहसंमेलनात बॅ.फारुकी यांचे प्रतिपादन

 देऊळगाव राजा : अशरफ पटेल

     आदर्श समाज घडविण्या साठी तसेच देश व या राज्याची सेवा करण्याच्या दृष्टीने शिक्षण घ्या असे प्रतिपादन बॅरिस्टर उमर कमाल फारुकी यांनी येथील आमेना अजीज उर्दू हायस्कूलच्या वार्षिक असणे संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी केले.




 स्थानिक आमेना अजीज उर्दू हायस्कूल अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज च्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटक म्हणून बॅ.उमर फारुकी बोलत होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष डॉ इक्बाल कोटकर होते.याप्रसंगी सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी रमेश कायंदे,काँग्रेस नेते मनोज कायंदे, नायब तहसीलदार प्रीती जाधव, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, राष्ट्रवादी नेते गणेश सवडे,एपिआय डी एम वाघमारे,गंगाधर जाधव, संस्थेचे उपाध्यक्ष इनायतखान कोटकर,ॲड.अर्पित मीनासे,शिवसेना नेते गोविंद झोरे,दीपक बोरकर, गोपाळ व्यास,निशिकांत भावसार,राजेश इंगळे,अजय शिवरकर,नवनाथ गोमधरे,इस्माईल बागवान,एमआयएमचे म.सलीम,रफिक खान,कदीर शेख,अय्युब कोटकर आदींची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थाचालक हाजी अल्ताफ कोटकर यांनी स्नेहसंमेलन व क्रीडा महोत्सवा संदर्भात माहिती विशद केली. इंग्लंडहून बॅरिस्टर ची डिग्री प्राप्त केल्याबद्दल कार्यक्रमाचे उद्घाटक बॅ. उमर कमाल फारुकी यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना बॅ. फारुकी म्हणाले या शाळेत मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त दिसत आहे याचा अर्थ समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटले आहे.एक शिक्षित  मुलगी आपल्या कुटुंबाला आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन आपल्या कुटुंबाचे भविष्य उज्वल करण्याच्या दिशेने कार्य करू शकते. पुढे बोलताना ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजाला पुढे आणण्यासाठी करावा.यावेळी रमेश कायंदे, संतोष खांडेभराड, गणेश सवडे, ॲड अर्पित मीनासे यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना शाळेच्या शैक्षणिक प्रगती बद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ इकबाल कोटकर यांनी शाळेच्या स्थापनेपासून आतापर्यंत शैक्षणिक व भौतिक प्रगती बद्दल सविस्तर विवेचन करताना संस्थेचे सचिव हाजी आलम कोटकर यांनी समाजाच्या मुलांच्या शैक्षणिक विकासाबद्दलच्या तळमळ सातत्याने केलेले प्रयत्न उपस्थित समोर मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य शाहरुख खान यांनी तर शाळेचे सीईओ काशीफ कोटकर यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेचे संचालक मुशीर कोटकर, अख्तर कोटकर, समीर कोटकर, आकिब कोटकर, यांच्यासह  शहरातील सामाजिक, राजकीय, क्षेत्रातील मान्यवरांसह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

 

Wednesday, January 11, 2023

माँ जिजाऊ जन्मोत्सवी जिल्ह्यात शासकीय सुट्टी जाहीर


 शिवसंग्राम संघटनेच्या पाठपुराव्याला यश

जिल्हाधिकारी डॉ. एचपी तुम्मोड यांना ऐतिहासिक निर्णय घेण्याचा मान मिळाला आहे.

देऊळगांव राजा :

दरवर्षी १२ जानेवारीला मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे माँ जिजाऊ जन्मोत्सव लाखो जिजाऊ प्रेमींच्या उपस्थितीत साजरा केला जातो. जिल्ह्यात हा उत्सव सर्वांना आनंदाने साजरा करण्यात यावा. या अनुषंगाने मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात  मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या धरतीवर १२ जानेवारीला जिल्हाधिकारी घोषित (कलेक्टर डिक्लेर) सुट्टी जाहीर करावी अशी आग्रहाची मागणी शिवसंग्राम संघटनेचे राजेश इंगळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दि.6 जानेवारी रोजी ऐका निवेदनाद्वारे केली  होती. त्यांच्या पाठपुराव्या मुळे 12 जानेवारीला सुट्टी जाहीर करण्यात आली.

      शिवसंग्राम संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, १२ जानेवारीला माँ जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता माँ जिजाऊ  साहेबांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रासह जिल्ह्यातून लाखो भाविक येतात व जिजाऊ चरणी नतमस्तक होतात. माँ जिजाऊ जन्मोत्सव मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सिंदखेडराजासह  संपूर्ण जिल्ह्यात माँ जिजाऊ जन्मोत्सवाच्या दिवशी आनंदमय वातावरण असते. लाखो जिजाऊ प्रेमीच्या साक्षीने माँ जिजाऊ जन्मोत्सव सोहळा संपन्न होतो. मात्र १२ जानेवारीला शासकीय सुट्टी नसल्याने  नोकरदारवर्गांना माँ जिजाऊ जन्म सोहळ्यास हजर राहता येत नाही. त्यामुळे अशा जिजाऊ प्रेमींची घोर निराशा होते. माँ जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त शासकीय सुट्टी असावी अशी खूप दिवसाची मागणी होती . मात्र  शासनाने या मागणीची दखल न घेतल्याने. राष्ट्रमाता माँ जिजाऊ साहेबांना सर्वांना अभिवादन करता यावे, यासाठी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या धरतीवर किमान १२ जानेवारीला तरी मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात जिल्हाधिकारी घोषित (कलेक्टर डिक्लेर) शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी आग्रहाची मागणी शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे या मागणीला योग्य न्याय देण्याचा सन्मान जिल्हाधिकारी डॉ. एचपी तुम्मोड यांना मिळाला आहे. जिल्हाधिकारी  यांनी ऐतिहासिक  निर्णय देत  जिल्ह्याला  12 सुट्टी जाहीर केल्यामुळे   शिवसंग्राम चे राजेश इंगळे, जहीर पठाण, अजमत खान, गजानन पवार, निलेश गिते, देशमुख, शेख राजू  सह आदींनी आतिष  बाजी करून  जल्लोष  साजरा केला आहे.



Monday, November 7, 2022

कृषीमंत्री अब्दुल सत्तारांकडून सुप्रिया सुळेंबाबत अपशब्द

 


 राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक 

   देऊळगावराजा : प्रतिनिधी  

      राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून एका वृत्तवाहिनीशी बोलताना अपशब्द वापरले आहेत. यावरून आता राजकीय वातावरण चांगलच तापायला सुरूवात झाली आहे. सत्तारांच्या या वक्तव्यावर  विविध प्रतिक्रिया उमटत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अब्दुल सत्तार यांनी माफी मागावी  अन्यथा त्याला महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही. असा अल्टिमेटम दिला आहे. घोषणा बाजी करत अब्दुल सत्तार यांचा पुतळा जाळण्यात आला.

          कुठल्याही पक्षाची महिला असेल, कुठल्याही धमार्ची महिला असेल तिच्याबद्दल शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात जो महिलांचा सन्मान आहे, त्याला अनुसरूनच आहे. तशीच शिकवण आम्हाला दिल्या गेली. नव्हे तर आमचा पक्ष तो प्रोटोकॉल पाळत असतो. दोन दिवसांपूर्वी सत्तेतील आमदार गुलाबराव पाटील यांनीही एक वक्तव्य केलं होतं, त्यावरूनही संतापाचे वातावरण निर्माण झाले होते आणि आता सत्तेचा माज असलेले कृषीमंत्री अब्दुल सत्तार वेळ पडली तरी आम्ही त्यांना अपशब्द वापरू शकतो. परंतु ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यामुळे अम्हाला संस्कृतीच्या बाहेर जायचं नाही. परंतु जो शब्द अब्दुल सत्तार नावाच्या व्हायात माणसाने वापरला आहे. अम्हाला पक्षाचे संस्कार विसरून पुढची पातळी गाठता येते, मात्र ते शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना खपणार नाही. म्हणून आम्ही   संयमाने बोलत आहे. स्थानिक बस स्थानक चौकात कृषीमंत्री अब्दुल सत्तारांना अल्टिमेट आहे की, २४ तासांच्या आत सुप्रिया सुळेंची नाक घासून माफी मागावी, अन्यथा त्याला महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही. त्याने वापरलेला शब्द हा समस्त स्त्री जातीचा अपमान आहे. त्याला जो सत्तेचा उन्माद झालाय, त्याची मस्ती आम्ही उतरल्याशिवाय राहणार नाही अशी घोषणा बाजी करत अब्दुल सत्तार यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. याप्रसंगी तालुकाध्यक्ष उद्धव म्हस्के, गजानन पवार, गणेश सवडे, संतोष खांडेभराड, प्रा. दिलीप कुमार झोटे, कवीश जिंतूरकर राजीव सिरसाठ, शहराध्यक्ष अ‍ॅड.अर्पित मिनासे, सै.करीम, शेख कदीर, कशीफ खान कोटकर, मो.रफीक, अरविंद खांडेभराड, धनंजय मोहिते, बैरागी, सुनिल शेजुळकर, विशाल पवार, आदी राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्याकर्ते उपस्थित होते.