आ. डॉ. राजेंद्र शिंगणे साहेब यांच्या प्रयत्नांना यश,
देऊळगावराजा : प्रतिनिधी
मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदार संघातील देऊळगावराजा व सिंदखेडराजा तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयांना स्वतची इमारत नसल्याने वेगवेगळ्या ठिकाणी ही कार्यालये कार्यरत आहे. ही बाब लक्षात घेऊन या मतदार संघाचे आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांनी या दोन्ही तालुक्यात प्रशासकीय इमारत व्हावी यासाठी शासन दरबारी मागणी केली होती. माहविकास आघाडीचे सरकार असतांना माजी अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी केली होती. त्यावेळीच हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात होता. परंतु आठ महिन्या अगोदर सत्तांतरण झाले आणि ही मागणी मागे पडली. त्यानंतर पुन्हा तीन महिण्यागोदर या संदर्•ाात शासनाकडे मागणी करण्यात आली. व शासनाने ती मान्य केली असून या दोन्ही तालुक्यातील प्रशासकीय इमारतीसाठी जवळपास 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या इमारतीचे बांधकाम झाल्यावर बरीच शासकीय कार्यालय एका छताखाली येऊन मतदार संघातील शासकीय कामानिमित्त येणाºया जनतेला सोयीचे होणार आहे.



No comments:
Post a Comment