राष्ट्रसंत श्री सेनाजी महाराज यांची ८३३ वी जयंती उत्साहात साजरी
देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य ही संतांची भूमि आहे. या भूमिवर संत, महात्मा व थोर पुरुष होऊन गेले कित्येक संतांचा जन्म हा वेगवेगळ्या राज्यातील आहे. पण कर्मभूमि मात्र महाराष्ट्र आहे. असेच एक राष्ट्रसंत म्हणजे संत श्री सेनाजी महाराज राज्यसतील नव्हे तर संपूर्ण देशभरातील नाभिक समाज श्री संत सेनाजी महाराजांना पुजतो असे प्रतिपदान दिलीप शेजूळकर यांनी केली आहे.
दि.८ मार्च रोजी स्थानिक राष्ट्रसंत श्री सेनाजी महाराज समाजिक सभागृह येथे राष्ट्रसंत श्री सेनाजी महाराज यांची ८३३ वी जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते माल्यर्पण करुन ८ मार्च महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या हस्ते पुजन व महाआरती करण्यात आली. याप्रसंगी विठ्ठल जाधव, ज्ञानेश्वर वाघ, शाहीर कंकाळ, पत्रकार सुरज गुप्ता यांनी मोलाचे समाजाला मार्गदर्शन केले. पुढे बोलतांना शेजूळकर म्हणाले की, राष्ट्रसंत श्री सेनाजी महाराज यांचे व त्यांच्या प्रगल्भ विचारांचे नमन करावे मिरवणूक तथा गाजा वाजा न करता साध्या पद्धतीने सेनाजी महाराज यांना अभिवादन करावे तसेच त्यांच्या परिवर्तनवादी विचारांना अमलात आणून प्रत्येक घरात त्यांचे विचार पोहचविण्याचे कार्य करणार असे संकल्प केले. राष्ट्रसंत श्री सेनाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्व नाभिक सामजाने आपले प्रतिष्ठाण बंद ठेवले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार सुनिल शेजुळकर यांनी केले. यावेळी नाभिक बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:
Post a Comment