आमेना अजीज हायस्कूलच्या स्नेहसंमेलनात बॅ.फारुकी यांचे प्रतिपादन
देऊळगाव राजा : अशरफ पटेल
आदर्श समाज घडविण्या साठी तसेच देश व या राज्याची सेवा करण्याच्या दृष्टीने शिक्षण घ्या असे प्रतिपादन बॅरिस्टर उमर कमाल फारुकी यांनी येथील आमेना अजीज उर्दू हायस्कूलच्या वार्षिक असणे संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
स्थानिक आमेना अजीज उर्दू हायस्कूल अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज च्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटक म्हणून बॅ.उमर फारुकी बोलत होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष डॉ इक्बाल कोटकर होते.याप्रसंगी सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी रमेश कायंदे,काँग्रेस नेते मनोज कायंदे, नायब तहसीलदार प्रीती जाधव, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, राष्ट्रवादी नेते गणेश सवडे,एपिआय डी एम वाघमारे,गंगाधर जाधव, संस्थेचे उपाध्यक्ष इनायतखान कोटकर,ॲड.अर्पित मीनासे,शिवसेना नेते गोविंद झोरे,दीपक बोरकर, गोपाळ व्यास,निशिकांत भावसार,राजेश इंगळे,अजय शिवरकर,नवनाथ गोमधरे,इस्माईल बागवान,एमआयएमचे म.सलीम,रफिक खान,कदीर शेख,अय्युब कोटकर आदींची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थाचालक हाजी अल्ताफ कोटकर यांनी स्नेहसंमेलन व क्रीडा महोत्सवा संदर्भात माहिती विशद केली. इंग्लंडहून बॅरिस्टर ची डिग्री प्राप्त केल्याबद्दल कार्यक्रमाचे उद्घाटक बॅ. उमर कमाल फारुकी यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना बॅ. फारुकी म्हणाले या शाळेत मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त दिसत आहे याचा अर्थ समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटले आहे.एक शिक्षित मुलगी आपल्या कुटुंबाला आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन आपल्या कुटुंबाचे भविष्य उज्वल करण्याच्या दिशेने कार्य करू शकते. पुढे बोलताना ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजाला पुढे आणण्यासाठी करावा.यावेळी रमेश कायंदे, संतोष खांडेभराड, गणेश सवडे, ॲड अर्पित मीनासे यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना शाळेच्या शैक्षणिक प्रगती बद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ इकबाल कोटकर यांनी शाळेच्या स्थापनेपासून आतापर्यंत शैक्षणिक व भौतिक प्रगती बद्दल सविस्तर विवेचन करताना संस्थेचे सचिव हाजी आलम कोटकर यांनी समाजाच्या मुलांच्या शैक्षणिक विकासाबद्दलच्या तळमळ सातत्याने केलेले प्रयत्न उपस्थित समोर मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य शाहरुख खान यांनी तर शाळेचे सीईओ काशीफ कोटकर यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेचे संचालक मुशीर कोटकर, अख्तर कोटकर, समीर कोटकर, आकिब कोटकर, यांच्यासह शहरातील सामाजिक, राजकीय, क्षेत्रातील मान्यवरांसह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.



No comments:
Post a Comment