Wednesday, January 11, 2023

माँ जिजाऊ जन्मोत्सवी जिल्ह्यात शासकीय सुट्टी जाहीर


 शिवसंग्राम संघटनेच्या पाठपुराव्याला यश

जिल्हाधिकारी डॉ. एचपी तुम्मोड यांना ऐतिहासिक निर्णय घेण्याचा मान मिळाला आहे.

देऊळगांव राजा :

दरवर्षी १२ जानेवारीला मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे माँ जिजाऊ जन्मोत्सव लाखो जिजाऊ प्रेमींच्या उपस्थितीत साजरा केला जातो. जिल्ह्यात हा उत्सव सर्वांना आनंदाने साजरा करण्यात यावा. या अनुषंगाने मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात  मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या धरतीवर १२ जानेवारीला जिल्हाधिकारी घोषित (कलेक्टर डिक्लेर) सुट्टी जाहीर करावी अशी आग्रहाची मागणी शिवसंग्राम संघटनेचे राजेश इंगळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दि.6 जानेवारी रोजी ऐका निवेदनाद्वारे केली  होती. त्यांच्या पाठपुराव्या मुळे 12 जानेवारीला सुट्टी जाहीर करण्यात आली.

      शिवसंग्राम संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, १२ जानेवारीला माँ जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता माँ जिजाऊ  साहेबांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रासह जिल्ह्यातून लाखो भाविक येतात व जिजाऊ चरणी नतमस्तक होतात. माँ जिजाऊ जन्मोत्सव मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सिंदखेडराजासह  संपूर्ण जिल्ह्यात माँ जिजाऊ जन्मोत्सवाच्या दिवशी आनंदमय वातावरण असते. लाखो जिजाऊ प्रेमीच्या साक्षीने माँ जिजाऊ जन्मोत्सव सोहळा संपन्न होतो. मात्र १२ जानेवारीला शासकीय सुट्टी नसल्याने  नोकरदारवर्गांना माँ जिजाऊ जन्म सोहळ्यास हजर राहता येत नाही. त्यामुळे अशा जिजाऊ प्रेमींची घोर निराशा होते. माँ जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त शासकीय सुट्टी असावी अशी खूप दिवसाची मागणी होती . मात्र  शासनाने या मागणीची दखल न घेतल्याने. राष्ट्रमाता माँ जिजाऊ साहेबांना सर्वांना अभिवादन करता यावे, यासाठी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या धरतीवर किमान १२ जानेवारीला तरी मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात जिल्हाधिकारी घोषित (कलेक्टर डिक्लेर) शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी आग्रहाची मागणी शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे या मागणीला योग्य न्याय देण्याचा सन्मान जिल्हाधिकारी डॉ. एचपी तुम्मोड यांना मिळाला आहे. जिल्हाधिकारी  यांनी ऐतिहासिक  निर्णय देत  जिल्ह्याला  12 सुट्टी जाहीर केल्यामुळे   शिवसंग्राम चे राजेश इंगळे, जहीर पठाण, अजमत खान, गजानन पवार, निलेश गिते, देशमुख, शेख राजू  सह आदींनी आतिष  बाजी करून  जल्लोष  साजरा केला आहे.



No comments:

Post a Comment