Friday, March 10, 2023

अर्थसंकल्पात सरकारला शिवस्मारकाचा विसर - राजेश इंगळे


 देऊळगाव राजा : 

     अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे मोठा गाजावाजा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलपूजन केले. मात्र प्रत्येक्षात कामाला अजूनही सुरुवात झालेली नाही. शिवाय राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर केलेल्या अर्थसंकल्पात शिव स्मारकाबाबत कोणतीही तरतूद करण्यात आलेली नसल्याने अर्थसंकल्पात सरकारला शिवस्मारकाचा विसर पडला असल्याचा आरोप शिवसंग्राम चे राजेश इंगळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

     सदर प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहि  आहे की,अर्थसंकल्पी अधिवेशनात नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्यामध्ये सर्व घटकांना न्याय देत भरीव आर्थिक तरतूद करण्यात आलीआहे. मात्र गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाबाबत साधा ब्र शब्द देखील सरकारने काढला नाही.शिवसंग्राम हा मित्र पक्ष म्हणून महायुतीत सामील आहे. मागील महायुती सरकारच्या काळात शिवसंग्राम चे  अध्यक्ष स्वर्गीय विनायकराव मेटे हे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष होते. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक व्हावे म्हणून आ.स्वर्गीय विनायकराव मेटे यांनी आयुष्यभर लढा दिला.त्यावेळी तत्कालीन सरकारने शिवस्मारकाच्या पहिल्या टप्प्यातल्या बांधकामासाठी 2600 कोटी रुपयाची तरतूत केली होती. मात्र अजूनही प्रत्येक्षात बांधकामास सुरुवात झालेली नाही. मागील अर्थसंकल्पात मंजूर केलेल्या निधीची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप पर्यंत झाली नाही परिणामी सहा वर्षे उलटूनही शिव स्मारकाच्या पायाभरणीला प्रत्यक्षात सुरुवात झाली नाही, शिवाय मागील अर्थसंकल्पात मंजूर निधीतुन अद्याप पर्यंत शिवस्मारका च्या कामाला सुरुवात झाली नाही. तसेच कालच्या अर्थसंकल्पात शिवस्मारकासाठी वाढीव तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे अर्थ संकल्पात सरकारला शिवस्मारकाचा विसर पडला की काय? असा प्रश्न शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. शिवसंग्रामचे कार्यकर्ते स्वर्गीय विनायकराव मेटे यांचा लढा व्यर्थ जाऊ देणार नाही. सरकारने शिवस्मारकाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी,असे पत्र शिवसंग्रामचे राजेश इंगळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे.

No comments:

Post a Comment