देऊळगांव राजा : (प्रतिनिधी)
शैक्षणिक दृष्ट्या राज्यात आदर्श ठरलेल्या तसेच सर्वाधिक पटसंख्या असलेल्या नगरपालिकेच्या शाळेला स्थानिक नगरपालिकेचे प्रशासनाधिकारी यूनुस खान यांनी भेट दिली. याप्रसंगी अनेक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक श्री कोळी यांच्याशी त्यांनी शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा केली.
संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक गुणवत्तेचा मॉडेल ठरलेल्या तसेच महाराष्ट्रात सर्वाधिक पटसंख्या असलेली कराड येथील नगरपरिषद शाळा क्रमांक ३ ला आज नगरपालिकेचे प्रभारी प्रशासन अधिकारी यांनी भेट दिली.याप्रसंगी विद्यार्थ्यांसाठी शाळेत असलेली शैक्षणिक साहित्य,संगणक वर्ग, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी असलेले सुसज्ज पुस्तकालयाचे दालन,विद्यार्थ्यांसाठी आरओ पिण्याचे पाणी प्लॅन्ट, सोलार विद्युत संच आदींची पाहणी केली. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शाळेत करावयाला लागणाऱ्या उपाययोजना बद्दल अनेक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांच्या समवेत चर्चा केली.यावेळी आय एस ओ नामांकन प्राप्त शाळेचे मुख्याध्यापक तथा महाराष्ट्र नगरपरिषद शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अर्जुनराव कोळी सर यांच्या समवेत शैक्षणिक विषयावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी व्हॉइस ऑफ मिडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर , मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाचे माजी तालुका अध्यक्ष तथा पत्रकार अशरफ पटेल, न.प उर्दू शाळेचे सेवा जेष्ठ शिक्षक अब्दुल हई, शेख हनिफ भाई यांची उपस्थिती होती.


No comments:
Post a Comment