Thursday, January 31, 2019

श्री व्यंकटेश महाविद्यालयात राज्यस्तरीय पावर पाॅईंट प्रेझेंटेशन व पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा संपन्न


देऊळगावराजा :
       स्थानिक श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागाच्या
वतीने राज्यस्तरीय पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन व प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत  महाराष्ट्रभरातील विविध १०० महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत कु स्वाती सातव या मलकापूर येथील विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थींनीने प्रथम क्रमांक पटकवला. असिफ शहा या श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीने द्वितीय व भूमिका मोरे  या जी एस महाविद्यालय  खामगाव येथील विद्यार्थीनीने तृतीय
क्रमांक पटकवला. परीक्षक म्हणून प्रा. अरविंद तायडे व प्रा.डॉ. सविता लोथे हे उपस्थित होते. प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत विविध महाविद्यालयातील १५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत रूबीना परवीन मोहम्मद या चिखली येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकवला. द्वितीय क्रमांक जिजामाता महाविद्यालय बुलडाणा च्या कु. वैष्णवी धीरबस्सी या विद्यार्थिनीने मिळवला. कु. अश्विनी खांडेभराड व कु. मीना मंडळकर या श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या पोस्टरला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. गो.से.महाविद्यालय खामगावच्या कु. प्रियंका शर्मा ह्या विद्यार्थिनीस प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले. परीक्षक म्हणून प्रा.डॉ.व्ही. आर. काकडे व प्रा. डॉ. एम. टी. निकम  यांनी जबाबदारी पार पाडली. पारितोषिक वितरण समारोहामध्ये उपस्थित मान्यवर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गजानन जाधव यांनी मार्गदर्शन केले. उपरोक्त स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक
पटकवणा-या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५०० रु,
१००० रु,  ७०० रु रोख पारितोषिक, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.निलेश काकडे यांनी केले. प्रास्ताविक प्रा.ज्ञानेश्वर शिंब्रे यांनी केले व अतिथी परिचय प्रा.पांडुरंग  पवार यांनी करून दिला,तसेच उपस्थितांचे आभार प्रा.अरविंद कानवटे यांनी व्यक्त केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा. ज्ञानेश्वर शिंब्रे व संगणकशास्त्र विभागप्रमुख डाॅ.रूपाली तेलगड, प्रा.पवन कदम,प्रा.सोपान चव्हाण यांच्यासह  इतर प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment