शिवसंग्रामच्या स्वाक्षरी अभियानास उस्फुर्त प्रतिसाथ..!
देऊळगाव राजा : प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्याचे नामकरण "राजमाता जिजाऊ नगर"करण्यात यावे या मागणीसाठी आज देऊळगांव राजा शहरात बस स्टँड चौक येथे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आ.विनायकराव मेटे यांच्या मार्गदर्शनाने शिवसंग्राम देऊळगांव राजा तालुक्याच्या वतीने भव्य स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले.यावेळी तालुक्यातील हजारो नागरिकांनी आपली स्वाक्षरी करून सदर मागणीला पाठींबा दिला.
बुलढाणा जिल्हा हा राजमाता जिजाऊ माँ साहेबांचा जिल्हा म्हणून संपूर्ण देशात प्रचलित आहे.या जिल्ह्यात मातृतीर्थ सिंदखेड राजा हे राजमाता जिजाऊ माँ साहेबांचे जन्मस्थान असून याच मातेच्या कुशीतून छत्रपती शिवाजी महाराज यांनी जन्म घेतला व छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून इतिहास घडविला.त्यामुळे आज महाराष्ट्राची नव्हे तर देशाची जगभरात ओळख निर्माण झाली आहे.अशी ओळख निर्माण करणाऱ्या तसेच शूरवीर छत्रपती पुत्र घडविणाऱ्या महान आशा राजमाता जिजाऊ माँ साहेबांचा इतिहास त्रिकाल अमर राहावा व पुढील येणाऱ्या पिढीस याचा सार्थ अभिमान वाटावा यासाठी बुलढाणा जिल्ह्याचे नामकरण "राजमाता जिजाऊ नगर" करण्यात यावे.या मागणीसाठी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आ.विनायजराव मेटे यांच्या नेतृत्वात १ जाने.रोजी जिल्हाभर स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले.त्या अनुषंगाने देऊळगाव राजा येथे स्थानिक बस स्थानक चौक येथे सुरू असलेल्या स्वाक्षरी अभियानात तालुक्यातील हजरो नागरिकांनी आपली स्वाक्षरी करून नामकरणाच्या मागणीस सक्रिय पाठींबा दर्शविला.यामध्ये भैयासाहेब पाटील प्रदेश सचिव भाजपा अल्प मोर्चा म राज्य,डॉ.गणेश मांटे, डॉ.रामदासी शिंदे,संतोष खांडेभारड,शिवसेनेचे शहर अध्यक्ष मोरेश्वर मिनासे,रंगनाथ कोल्हे,जितू खंदारे,गौतम कासारे, प्रकाश गीते,सुनील शेजुळकर, यांच्यासह तालुक्यातील हजरो नागरिकांनी स्वाक्षरी करून सहभाग दर्शविला.यावेळी शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, जहीर पठाण, अजमत पठाण, संतोष हिवाळे, गजानन खार्डे, सुरेश निकाळजे, आयाज पठाण, अनिस खान यांनी नागरिकांना स्वाक्षरी अभियानात सहभाग घेण्याचे आवाहन केले.




No comments:
Post a Comment