Friday, February 1, 2019

खडकपूर्णा धरण क्षेत्रात विहीर खोदकामात ब्लास्टिंग करणारयांवर गुन्हा दाखल करा..!

 
पाणी बचाव समितीची ठाणेदाराकडे तक्रार.. 
 देऊळगांवराजा :  प्रतिनिधी     
        तालुक्यातील संत चोखा सागर खडकपूर्णा धरणाचे पाणी जालना जिल्ह्यात नेण्यासाठी  नियमबाह्य ग्रीड पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीचे खडकपूर्णा धरण क्षेत्रात खोदकाम करतांनी संबंधित ठेकेदार ब्लास्टिंगचा वापर करीत असल्याने या प्रकल्पालच्या भिंतीला मोठी हानी पोहचू शकते संबधित ठेकेदारावर तात्काळ अटक करुन गुन्हा दाखल करा,अशी मागणी पाणी बचाव समितीच्या वतीने तक्रार ठाणेदाराला केली आहे.
        राज्याचे पाणी पुरवठा मंत्री ना.बबनराव लोणीकर यांनी जालना जिल्हातील ९२ गावांना  खडक पूणार्चे पाणी देण्यासाठी नियमबाह्य ग्रीड पाणी पुरवठा योजनेचे मंजूर करून घेतली आहे.या पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीचे खडकपूर्णा धरण क्षेत्राच्या मुख्य गेट जवळ खोदकामास मागील आठवड्यापासून  सुरवात देखील करण्यात आली आहे. या नियमबाह्य योजनेच्या विहिरीचे खोदकाम धरणाच्या मुख्य गेट पासुन आगदी हाकेच्या अंतरावर करण्यात येत आहे. ही योजना नियमबाह्य असल्याने विहिरीचे खोदकाम लवकर व्हावे म्हणून खोदकाम करण्यासाठी सर्रासपणे धरण क्षेत्रात ब्लास्टिंगचा वापर संबंधित ठेकेदारांनाकडून करण्यात येत आहे. नियमानुसार धरण क्षेत्रात ब्लाटिंग करणे कायद्याने गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. ब्लास्टिंगमुळे धरणाच्या प्रकल्पाच्या मुख्य भिंतीला मोठी हानी पोहचू शकते. परिणामी धरणाच्या मेन गेटच्या भिंतीला हादरे बसुन भविष्यात धरण फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असतांना या नियमबाह्य योजनेच्या विहिरीचे खोदकाम करणारे ठेकेदार सर्रासपणे धरण क्षेत्रात ब्लास्टिंग करीत आहे. प्रकल्पाच्या भिंतीला मोठा नुकसान होण्याची शक्यता नकारता येत नाही. संबधित ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करा. अशी मागणी पाणी बचाव समितीच्या वतीने तक्रार ठाणेदार सारंग नवलकार यांच्याकडे केली आहे. याप्रसंगी पाणी बचाव समितीचे सदस्य उपस्थित होते. 




No comments:

Post a Comment