उपाध्यक्ष पदी पुजा कायंदे तर सचिव पदी प्रशांत पंडित
देऊळगांवराजा : प्रतिनिधी
आजच्या युगात सोशल मिडीयाच्या वापर अधिक झाल्याने या डिजिटल युगाकडे वाढचाल करीत देऊळगावराजा तालुक्यात इल्कट्रॉनिक मिडीयाची नविन रुपात स्थापना करुन जन सामन्यच्या न्याय व हक्का साठी लढा देण्याचा संकल्प करण्यात आले. देऊळगावराजा इल्कट्रॉनिक मिडीयाचे तालुकाध्यक्ष पदी दयालसिंग बावरे, उपाध्यक्ष पदी पुजा कायंदे तर सचिव पदी प्रशांत पंडित यांची अविरेध निवड करण्यात आली.
स्थानिक विश्रामगृह येथे दि.१ फेब्रूवारी रोजी देऊळगावराजा इल्कट्रॉनिक मिडीयाची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत नविन कार्यकारणी साठी चर्चा करण्यात आली. आज रोजी प्रिंट मिडीया सोबतच इल्कट्रॉनिक मिडीयाचे के्रज वाढल्याने आज रोजी प्रत्येकांच्या हातत र्स्माट फोन आहे. आणि मोबाईल वरच आपल्या बातम्या अवघ्या काही वेळेतच प्रकाशित होतात. यासाठी देऊळगावराजा तालुक्यात इल्कट्रॉनिक मिडीयाची नविन रुपात स्थापना करुन नविन कार्यकरणीची घोषणा याप्रसंगी करण्यात आली. तालुकाध्यक्ष पदी दयालसिंग बावरे, उपाध्यक्ष पदी पुजा कायंदे तर सचिव पदी प्रशांत पंडित यांची अविरेध निवड करण्यात आली. तर उर्वरीत कार्यकारणी दि.१० फेब्रूवारी रोजी करण्यात येणार आहे. नवनिर्वाचित पदाधिकाºयांचे मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षा सुषमा राऊत व राष्ट्रवादी युवा नेते गणेश सवडे, मंगेश तिडके यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी अशरफ पटेल, अमोल हरणे, प्रकाश बस्सी, वसंता माळोदे, विलास जाधव, अतिश खराट, गजानन कायंदे, प्रविण काकडे, विलास झोरे, विनायक शाहणे, गजानन नागरे, वनिता कव्हळे, आदी उपस्थित होते.



No comments:
Post a Comment