शिवसंग्रामची पाटबंधारे अधिक्षक अभियंत्यांकडे तक्रार..
देऊळगांव राजा : प्रतिनिधी
तालुक्यातील संत चोखा सागर खडकपूर्णा धरणाचे पाणी जालना जिल्ह्यात नेण्यासाठी नियमबाह्य ग्रीड पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीचे खडकपूर्णा धरण क्षेत्रात खोतकाम करतांनी संबंधित ठेकेदार ब्लास्टिंगचा वापर करीत असल्याने त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा,अशी मागणी आज शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांनी अधीक्षक अभियंता पाटबंधारे प्रकल्प मंडळ बुलढाणा यांच्याकडे केली आहे.
राज्याचे पाणी पुरवठा मंत्री ना.बबनराव लोणीकर यांनी जालना जिल्हातील ९२ गावांना खडक पूर्णाचे पाणी देण्यासाठी नियमबाह्य ग्रीड पाणी पुरवठा योजनेचे मंजूर करून घेतली आहे.या पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीचे खडकपूर्णा धरण क्षेत्रात मेन गेट जवळ खोदकामास मागील आठवड्यापासून सुरवात देखील करण्यात आली आहे. या नियमबाह्य योजनेच्या विहिरीचे खोदकाम धरणाच्या मेन गेट पासुन आगदी हाकेच्या अंतरावर करण्यात येत आहे. ही योजना नियमबाह्य असल्याने विहिरीचे खोदकाम लवकर व्हावे म्हणून खोदकाम करण्यासाठी सर्रासपणे धरण क्षेत्रात ब्लास्टिंगचा वापर संबंधित ठेकेदारांनाकडून करण्यात येत आहे.नियमानुसार धरण क्षेत्रात ब्लाटिंग करणे कायद्याने गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे.ब्लास्टिंगमुळे धरणाच्या मेन गेट ला मोठी हानी पोहचू शकते.परिणामी धरणाच्या मेन गेटच्या भिंतीला हादरे बसुन भविष्यात धरण फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.असे असतांना या नियमबाह्य योजनेच्या विहिरीचे खोदकाम करणारे ठेकेदार सर्रासपणे धरण क्षेत्रात ब्लास्टिंग करीत आहे.या विहिरीचे खोदकाम धरणाच्या मेन गेट जवळ असल्याने बकास्टिंगमुळे मेन गेट ला तीव्र हादरे बसत आहे.यामुळे मेन गेट ला मोठी हानी होऊन हे धरण भविष्यात फुटू शकते असा आरोप शिवसंग्राम ने केला आहे.त्यामुळे खडकपूर्णा धरण क्षेत्रात मेन गेट जवळ ब्लास्टिंग करून सुरू असलेले विहिरीचे खोदकाम तात्काळ बंद करून ब्लास्टिंग करणारे संबंधित ठेकेदार व ब्लास्टिंग ट्रॅक्टर मालक यांच्यावर गुन्हे दाखल करावे,अशी मागणी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने अधीक्षक अभियंता पाटबंधारे प्रकल्प मंडळ बुलढाणा यांच्याकडे केली आहे.सदर निवेदनावर शिवसंग्राम तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, तालुका संघटक जहीर खान,अजमत खान,आयाज खान,शंकर शिंदे,संतोष हिवाळे,विनोद खार्डे, हारूण शाह,मदन डुरे यांच्या स्वाक्षऱ्या आहे.


No comments:
Post a Comment