सिंदखेड राजा : प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा, जालना शहरासह ९२ गावांसाठी प्रस्तावित ग्रीड पाणीपुरवठा योजनेला खडकपूर्णा प्रकल्प क्षेत्रातील नागरिकांनी प्रचंड विरोध केला आहे. नागरिकांचा विरोधाला न जुमानता सुरु केलेले काम बंद करण्याची मागणी आता सर्वच स्तरातून वाढली असून खडकपूर्णातील थेंबरही पाणी परजिल्ह्यात देणार नाही, असा जोरदार निर्धार करत काल २८ जानेवरी रोजी देऊळगाव राजा तहसील कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला तर आज २९ जानेवारी रोजी सिंदखेड राजा मतदारसंघात बंद पाळण्यात आला..
परतूर, मंठा, जालना शहरासह ९२ गावांसाठी प्रस्तावित ग्रीड पाणीपुरवठा योजनेला आता सर्वच स्तरातून विरोध होत आहे. यासाठी सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते, नागरिकांनी लढा उभारला आहे. या लढ्याचा पहिला टप्पा म्हणून २८ जानेवारी रोजी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांच्यासह सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी देऊळगाव राजात विराट मोर्चा काढला. तर आज २९ जानेवारी रोजी बंद पुकारण्यात आला होता. या बंदला सर्वच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सिंदखेड राजा शहरासह तालुक्यातील गावांमध्येही बंद पाळण्यात आला. सिंदखेड राजा शहरात बंद पाळून नायब तहसीलदार एच. डी. वीर यांना निवेदन देण्यात आले. या बंद मध्ये कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस जगनराव ठाकरे, माजी नगराध्यक्ष सिताराम चौधरी, बबनराव म्हस्के, विद्यार्थी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप मेहेत्रे, युवासेना उप जिल्हाप्रमुख आतिश तायडे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र आढाव, राष्ट्रवादी शहराध्यक्ष राजेंद्र अंभोरे, शेख यासीन, नितीन चौधरी, कैलास मेहेत्रे, वैभव मिनासे, भिमगर्जना संघटनेचे योगेश म्हस्के, नगरसेवक बाबासाहेब जाधव, डॉ. मुरलीधर शेलोडे, मनसेचे शिवा पुरंदरे, डॉ. यशवंत झोरे, प्रकाश कुहिरे सहभागी झाले होते. सर्व व्यावसायीक, दुकानदार, हॉटेल, हातगाडी यांच्यासह इतरांनी आपली प्रतिष्ठाने, व्यवसाय बंद ठेऊन कडकडीत बंद पाळला..
देऊळगाव महीत उत्स्फूर्त प्रतिसाद .
देऊळगाव मही : प्रतिनिधी
संत चोखासागर प्रकल्पातून जालना जिल्ह्यात पाणी देण्यास नागरिकांनी कडाडून विरोध केला असून यासाठी आज देऊळगाव महीत कडकडीत बंद पाळण्यात आला..
खडकपुर्णा प्रकल्पासाठी ज्या भागातील शेतकऱ्यांच्या जमीनी गेल्या, ज्यांनी ३० वर्षे या प्रकल्पाची वाट पाहिली त्यांना या प्रकल्पाचा लाभ मिळणे गरजेचे असताना परतुर, मंठा, जालना, सिल्लोड, भोकरदन, जाफ्राबाद आदी ठिकाणी सदर प्रकल्पाचे पाणी दिले जात आहे. पाणीपुरवठा मंत्री ना. लोणीकर यांनी ९२ गावांसाठी त्यांच्या मतदारसंघात उजनी धरण खकडपुर्णा धरणापेक्षाही मोठे असताना केवळ बुलडाणा जिल्ह्याचे पाणी पळविण्यासाठी घाट घातला आहे. त्यामुळे सिंदखेड राजा मतदारसंघातील नागरिकांनी याला विरोध केला आहे. त्यासाठी आज देऊळगाव महीत बंद पाळण्यात आला. .
सर्व दुकाने, प्रतिष्ठाने बंद ठेऊन हे आंदोलन यशस्वी करण्यात आले. बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता..
बीबी : प्रतिनिधी
देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार या तिनही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी पळवू नये, या मागणीसाठी बीबतही कडकडीत बंद पाळण्यात आला. सदर योजना बंद करावी व इतर मागण्यांसाठी यावेळी निवेदन देण्यात आले. या निवेदनावर मुकेश राठोड, निलेश चव्हाण, कैलास मोरे, चैतन्य चव्हाण, चेतन बनकर, आनंद आटोळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत..



No comments:
Post a Comment