जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा येथे झालेल्या मारहाण प्रकरणात रावसाहेब भवर यांना अटक करुण कठोर शिक्षा व्हावी या साठी देऊळगावराज येथील माळी समाजाच्या महिलांच्या वतीने मोर्चा काढून तहलसीदाराला निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा येथे शेतकरी कुटुंबा वर झालेल्या मारहाण प्रकरणात जामिनिचा वाद कोर्टात असताना रावसाहेब भवर आणि त्यांचे नातेवाईकानी तसेच काही गुंड प्रवत्तिचे लोकांनी कायदा हातात घेऊन न्यानेश्वर खंडेभराड, क्रष्णा खंडेभराड, वीठल खंडेभराड, गंगा खंडेभराड, रेणुका खंडेभराड, प्रयाग खंडेभराड, यांना जीवे मारण्याच्या उधेशने केलेल्या हल्याचे निषेधात देऊळगावराज येथील माळी समाजाच्या महिलांच्या वतीने मोर्चा काढून तहसीलदार दीपक बजाड़ यांना निवेदन देण्यात आले. आरोपिना अटक करुण कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली. या निवेदनात पूजा खांडेभराड, सौ.रंजना शिंगणे, सौ.रेखा बोरकर, नीता खांडेभराड, रंजना तिड़के, अलका झोरे, सौ.सुनीता माने, संगीता खंडेभराड आदि महिलांचे सह्या आहेत.



No comments:
Post a Comment