जिल्हाधिकारी निरुपमा डांगे सोबत चर्चा
शासकीय पाणी पुरवठा योजना बुलढाणा जिल्हातिल विभागांची नाहरकत प्रमाणपत्र न घेता, १८ जुन २०१८ च्या परिपत्रकाची पायमल्ली
देऊळगांव राजा : प्रतिनिधी
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यकमा अंतर्गत जालना जिल्ह्यातील परतुर, मंठा आणि जालना शहरासह ९२ गावांसाठी प्रस्तावित ग्रिड पाणी पुरवठा योजनेच्या विहीर खोदकामास खड़कपूर्णा प्रकाल्पच्या बुडित क्षेत्रात प्रारंभ झालेला आहे. त्या करिता आंदोलन करुनही विहिरीचे काम सुरु आहे. त्या अनुषंगाने दि.२८ जानेवारी रोजी भगवान बाबा नगर चौकातून हजारोच्या संख्येत पण्याच्या धडक मोर्चा तहसील कार्यलयात काढून तहसिलदाराल निवेदन देण्यात आले. त्या नंतर आमदार डॉ. शशिकांत खेडेकर आणि माजी आमदार डॉ. राजेन्द्र शिंगणे यांनी विश्राम ग्रह वर बैठक घेऊन दि.२९ जानेवारी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करण्याचे ठरवले. बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ निरुपमा डांगे यांना ९२ गांवाची मंठा, परतुर शासकीय पाणी पुरवठा योजना बुलढाणा जिल्हातिल विभागांची नाहरकत प्रमाणपत्र न घेता, १८ जुन २०१८ च्या परिपत्रकाची पायमल्ली करुन केलेली पाणी पुरवठा योजना तात्काल जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नियुक्त करुन त्याचा अहवाल शासनाला सादर करावा. तोपर्यत तेथील अवैध काम थांबवावे, याबाबत बैठक घेऊन निवेदन देतांना ,संतचोखासागर खडकपुर्णा पाणी बचाव संघर्ष समितीचे सदस्य व सर्व पक्षीय मान्यवर उपस्थित होते करण्यात आली. या मोर्च्यात सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते.


No comments:
Post a Comment