Tuesday, January 29, 2019

संविधानाचा आधार सजग नागरिक असावा : सुरेश साबळे

                              

 
टीपू सुल्तान युवा मंच च्या वतीने एक शाम संविधान के नाम कार्यक्रमाचे आयोजन
 देऊळगांवराजा :  प्रतिनिधी
         सजग नागरिक हा संविधानाचा आधार असायला हवा, आपले हक्क मिळविताना कर्तव्याची जाणीवही असायला हवी, असे प्रतिपादन साहित्यक, लेखक, समीक्षक श्री सुरेश साबळे यांनी दि.२५ जानेवारी रोजी आयोजित एक शाम संविधान के नाम या कार्यक्रमात केले. महाराष्ट्रात संस्कृती, धर्म, वैचारिकता याची मोठी परंपरा राहिली आहे. पण प्रबोधनकार, संत गाडगे महाराज यांच्यानंतर धर्मचिकित्सेची परंपरा खंडित झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. 
            

स्थानिक बसस्थानक चौकातील न.प.व्यापारी संकुला समोर दि. २५ जानेवारी रोजी सांध्याकाळी टीपू सुल्तान युवा मंच च्या वतीने एक शाम संविधान के नाम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी व्यंकटेश महाविद्यलयचे प्रा.डॉ. गजानन जाधव, तर उदघाटक  म्हणून आमदार डॉ. शशिकांत खेडेकर उपस्थित होते.  प्रमुख पाहुने म्हणून सिंदखेडराजा नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.नाझेर काझी,   ठानेदार सारंग नवलकार आदि उपस्थित होते. याप्रसंगी डॉ.गजानन जाधव, आमदार डॉ.खेडेकर, ठाणेदार सारंग नवलकार, अ‍ॅड.काझी यांनी संविधान बद्दल माहिती दिली. साबळे पुढे म्हणाले की, विज्ञानाचा दुरुपयोग करून शोषण केले जाते. दिशाहीन केले. जाते;अशांविरोधात काम करणे हा अंधश्रद्धा निर्मूलनाचा मुख्य उद्देश आहे. जादू-टोणा विरोधी कायद्याची काय गरज,असे बोलले जायचे. मात्र, हा कायदा किती आवश्यक आहे, हे या कायद्यानंतर अडीचशेहून अधिक भोंदूबाबांना पकडल्यानंतर समोर आले. वैद्याानिक दृष्टीकोनातून प्रचार, प्रसार होणे गरजेचे आहे. आपली भारतीय राज्यघटना खूप चांगली आहे. त्यातील नियम प्रभावी पणे राबविण्याची गरज आहे. संविधान ही नियमांची चौकट असून स्वातंत्र, समता, बंधुता, धर्म निरपेक्षता या सर्वमूल्यांचा यात विचार होतो. भारताची राज्यघटना. प्रत्येक नागरिकाने वाचलंच पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे असं हे पुस्तक. घटना हा आपल्या देशातल्या सर्व कायद्यांचा पाया आहे. म्हणूनच कायदा पाळू इच्छाणाºया सर्वांनाच ही घटना कशी आहे, यामध्ये काय गोष्टी आहेत, याचं भान असणं आवश्यक आहे. २ वर्ष ११ महिने आणि १८ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर आणि अर्थातच अनेक विषयांवरच्या घमासान चचेर्नंतर ही घटना आकारास आली. भारताचं संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. आपण प्रेमाविषयी बोलतो; पण आपण ही राज्यघटना वाचलेली, पाहिलेली तरी असते का? ती मिळवून वाचायला तर हवीच. पण समजून घ्याया. कार्यक्रमाचे प्रस्ताविक टीपू सुल्तान युवा मंच चे संस्थापक अध्यक्ष शाकीर लाला यांनी संघटनेच्या वतीने घेण्यात येणाºया कामाची रुपरेषा उपस्थितां समोर मांडली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विष्णू बनकर यांनी केले तर आभार मोहसिन शेख यांनी मानले. या कार्यक्रामास यशस्वी करण्यासाठी टीपू सुल्तान युवा मंच चे संस्थापक अध्यक्ष शाकीर लाला, मोहसीन शेख, अझीम खान, अहेमद खान, हारुन शाह, शेख अमिन, अकबर बागवान, सलमान सय्यद, शाजेब कोटकर, समिर खान, कसीम कुरेशी आदी अथक परिश्रम घेतले.  
                 


No comments:

Post a Comment