उद्या मातृतीर्थ मतदार संघ बंद ठेवण्याचे आवाहन
पाण्याच्या गंभीर समस्येवर सर्व पक्षीय जन आक्रोश
देऊळगांवराजा : प्रतिनिधी
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यकमा अंतर्गत जालना जिल्ह्यातील परतुर, मंठा आणि जालना शहरासह ९२ गावांसाठी प्रस्तावित ग्रिड पाणी पुरवठा योजनेच्या विहीर खोदकामास खड़कपूर्णा प्रकाल्पच्या बुडित क्षेत्रात प्रारंभ झाला आहे. आंदोलन करुन सुरु असलेल्या विहिरीच्या कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली. त्या अनुषंगाने आज दि.२८ जानेवारी रोजी भगवान बाबा चौकातून पण्याच्या धडक मोर्च्याला सुरुवात करण्यात आली. या मोर्च्यात आजी माजी आमदारांसह सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाने देऊळगावराजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीवर संत चोखा सागर जलाशय बाधंलेला आहे. प्रमुख्याने मातृतीर्थ मतदार संघात प्रकल्प बांधण्यासाठी मंजुूरात दिली होती. त्यातील आज पर्यंत मातृतीर्थ मतदार संघासाठी पाण्याचा आरक्षण करण्यात आलेला नाही. त्यात पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या पुढाकारातून जालना जिल्ह्यातील परतुर, मंठा आणि जालना शहरासह ९२ गावांसाठी प्रस्तावित ग्रिड पाणी पुरवठा योजनेला मंजूरी मिळली होती. सात्तेचा दुरुपयोग करुण मंत्री लोणीकर यांनी पाणी मराठवाड्यात नेण्यचा कट रचला तसेच या योजनेसाठी संत चोखा सागर अर्थात खडकपूर्णा प्रकल्पाच्या परिसरातील ग्रामपंचायतीची हरकत नसल्याचे ठराव, वन जमिनीतून जलवाहिनीटाकण्यास ना हरकत प्रमाणपत्र राजकीय दाबाव तंत्र वापरुन करण्यात आले. म्हणून मातृतीर्थ मतदार संघातील नागरिकांनी महत्वपूर्ण भूमिका घेत दि.२८ जानेवारी रोजी धडक मोर्चे आयोजन करुन शासनाला जागृत करण्यात चे काम केले. त्या अनुषंगाने मतदार संघातील आजी माजी आमदारांनी मराठवाड्यात पाणी चोरी करुन उसाची लगवड करीत आहे. चोरी झालेल्या पाण्यामुळे मराठवाडा हा सधन होत आहे असा आरोप यावेळी करण्यात आले. मराठवाड्यात असंख्य जलाशाय पाण्याने तुडूंब भरलेले असतांना विदर्भातील जनतेवर पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सत्तेचा दुरपयोग करीत पाणी पळविण्याचा घाट रचला आहे. विदर्भात बांधलेल्या जलाशाय असूनही पाण्याचे आरक्षक्ण नाही, पाटाला पाणी नाही, शेतकºयांना सिंचनासाठी पाणी नाही, तर याभागात हरीत क्राती कशी होईल. एकीकडक अच्छे दिनचा स्वप्न दाखविणाºया भाजपा सरकार आज पाण्यासाठी तुच्छ राजकारण करीत आहेत. तर येणाºया निवडणुकात जनता काय करेल याचा अंत पाहू नका असे या धडक मोर्च्यात दाखविण्यात आलेला आहे. बबनराव लोणीकर यांनी लोअर दुधना असूनही विदर्भातील एकमेव संत चोखासागर खडकपूर्णा जलाशाय वर नजर ठेवून पाणी पळविण्याचा राजकारण करीत आहे. तसेच हट्टास करुन या भागातील बुडित क्षेत्रात विहिरीचे खोदकाम करुन जनतेची दिशाभूल करीत आहे. या भागातील शेतकरी आणि नागरिक आपल्या हक्काचा पाणी कोणाला देणार नाही अशी भूमिका घेवून सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भव्य मोर्चा काढून शासनाला इशारा दिला की, जनता जेव्हा रस्त्यात उतरते तेव्हा काय होतो. तहसिलदार दिपक बाजड यांना निवेदन देवून हा रोष व्यक्त करण्यात आले. याप्रसंगी मातृतीर् मतदार संघाचे आमदार डॉ.शशिकांत खेडेकर आणि माजी आरोग्यमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी मोर्च्याची दखल घेत पाण्यासाठी एल्गार पुकारला तसेच उद्या मातृतीर्थ मतदार संघ बंद ठेवून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी बैठक दि.२९ जानेवारी रोजी बुलडण्यात ठेवण्या आली आहे. प्रसंगी तालुक्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




No comments:
Post a Comment