Monday, January 28, 2019

डॉ.रामदास शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ४१९ रक्तदात्यांचे रक्तदान



१९ वर्षापासून रक्तदान कार्यक्रमाचे आयोजन
 देऊळगांवराजा :  प्रतिनिधी
श्री बालाजी महाराजांची पुण्य नगरीचे वैद्यकीय क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणारे डॉ.रामदास शिंदे यांच्या वाढदिवासानिमित्त शिव गणेश मंडळाच्या वतीने दि.२८ जानेवारी रोजी ४१९ रक्तदात्यानी रक्तदान करुन समाजात वेगळा संदेश दिला.
        विदर्भ प्रवेश द्वारावर असलेल्या श्री बालाजी महाराजांची पुण्य नगरीतून समाजसेवेचा वारसा पुढे नेत जन सेवेचे व्रत हाती घेवून वाटचाल करणारे आणि रुग्णांना अहोरात्र सेवा देणारे एक यशस्वी डॉक्टर म्हणून नावलौकीक मिळवलेले डॉ.रामदास शिंदे गोरगरीब जनतेला गेल्या तीन दशकापासून नि:स्वार्थ सेवा देत आहेत. डॉ.शिंदे यांच्यावर प्रेम करणाºया त्यांच्या चाहत्यांनी सतत १९ वर्षापासून रक्तदान शिबिरात मोठ्या उत्सहाने सहभाग नोंदवून दि.२८ जानेवारी रोजी ४१९ रक्तदात्यानी रक्तदान करुन दरवर्षी नविन विक्रमाची नोंद करीत आहेत. शिच गणेश मंडळाच्या वतीने १९ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान श्बििरात आज पर्यंत ३ हजार ६१९ रक्तदात्यांनी रक्तदान करुन रक्तदान हेच श्रेष्ठदान असा संदेश या माध्मयतून दिला. बालाजी नगरीच्या इतिहासात आज पर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वयंस्फृर्तीने रक्तदान शिबिरात झाल्याची नोंद नाही. यावेळी जनकल्याण रक्तपेढी, स्वामी समर्थ रक्त पेढी, लोकमान्य रक्त पेढी चमूने सहकार्य केले.  तसेच रक्तदान शिबरिाला आमदार संजय कुटे, डॉ.शशिकांत खेडेकर, माजी आरोग्यमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी डॉ.शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष गोविंद झोरे, स्वीकृत नगरसेवक वसंताअप्पा खुळे, जगदीश कापसे, खविसचे माजी अध्यक्ष अनिल रामाणे तसेच शिव गणेश मंडाळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  
                     

No comments:

Post a Comment