Friday, January 25, 2019

सर्व समाजातील क्षेत्रातील नागरकांनी धडक मोर्चात सहभागी व्हा : गणेश सवडे


देऊळगांव राजा : प्रतिनिधी
      मातृतीर्थ मतदार संघातील देऊळगावराजा तालुक्यात संत चोखा सागर प्रकल्पाची निर्मिती केली मात्र धरण उशाला  कोरड घशाला अशी  मातृतीर्थ मतदार संघातील गावांची अवस्था या मतदार संघातील गावांना सिंचनाची तसेच पिण्याची पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे सातत्याने  गेल्या वर्षांपासून भीषण दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना करावा लागत आहे हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्याने हरित क्रांतिचे स्वप्न पुर्ण होणार असल्याने शेतकरी बांधवांच्या आशा पल्लवित झाल्या यासाठी दि.२८ जानेवारी रोजी हजारोच्या सख्यने उपस्थित राहण्याचे आव्हान राष्ट्रवादी युवा नेते गणेश सवडे यांनी केले आहे.
       मात्र संत चोखा सागर धरणाचे पाणी  मतदार संघातील गावांना सिंचन तसेच पिण्यासाठी आरक्षीत न केल्या गेल्याने शेतकरी बांधवाना विविध संकटांना सामोरे जावे लागणार आहे मात्र पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी पदाचा गैरवापर करून हुकूमशाही व दंडेलशाही वापर करत मराटवाड्यातील त्याच्या मतदारसंघातील ९२ गावासाठी कोटयावधी रुपयांची योजना मंजूर करून त्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे  मात्र भविष्यात ही योजना पूर्णत्वास गेल्यास सिंदखेडराजा मतदार संघातील गावांना पाण्याचा थेंब ही मिळणार नाही. ही योजना बंद करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकचळवळीची गरज असुन सर्व पक्षातील राजीकय नेत्यांनी विकासाच्या तसेच शेतकऱ्यांच्या कल्यानासाठी राजकीय जोडे बाहेर काढुन एकत्र येण्याची गरज आहे. दि. २८ जानेवारी सोमवार रोजी देऊळगावराजा येथे होणाऱ्या धडक मोर्चात ही योजना बंद करण्यासाठी माजी मंत्री डॉ. राजेन्द्र शिंगणे उपस्थित राहणार आहे.  देऊळगावराजा तसेच सिंदखेडराजा तालुक्यातील २१८ गावातील सर्व क्षेत्रातील नागरिकांनी सहभागी व्हावे  असे आव्हान राष्ट्रवादी युवा नेते गणेश सवडे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment