सर्व समाजातील क्षेत्रातील नागरकांनी धडक मोर्चात सहभागी होण्याचे आव्हान
देऊळगांवराजा : प्रतिनिधी
सततची दुष्काळजन्य परिस्थिती , अस्मानी सुलतानी संकटांचा सामना, बेरोजगारी तसेच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी व शेतकऱ्यांचा सामाजिक ,आर्थिक स्तर उंचावुन सर्वांगीण विकास साधण्यासाठी मातृतीर्थ मतदार संघातील देऊळगावराजा तालुक्यात संत चोखा सागर प्रकल्पाची निर्मिती केली मात्र धरण उशाला कोरड घशाला अशी मातृतीर्थ मतदार संघातील गावांची अवस्था या मतदार संघातील गावांना सिंचनाची तसेच पिण्याची पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे सातत्याने गेल्या वर्षांपासून भीषण दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना करावा लागत आहे हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्याने हरित क्रांतिचे स्वप्न पुर्ण होणार असल्याने शेतकरी बांधवांच्या आशा पल्लवित झाल्या मात्र संत चोखा सागर धरणाचे पाणी मतदार संघातील गावांना सिंचन तसेच पिण्यासाठी आरक्षीत न केल्या गेल्याने शेतकरी बांधवाना विविध संकटांना सामोरे जावे लागणार आहे मात्र पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी पदाचा गैरवापर करून हुकूमशाही व दंडेलशाही वापर करत मराटवाड्यातील त्याच्या मतदारसंघातील ब्यान्नव गावासाठी कोटयावधी रुपयांची योजना मंजूर करून त्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे मात्र भविष्यात ही योजना पूर्णत्वास गेल्यास सिंदखेडराजा मतदार संघातील गावांना पाण्याचा थेंब ही मिळणार नाही तसेच खडकपूर्णा नदीवर एकूण चार कोल्हापूरी बंधाऱ्याचे बांधण्यात आले मात्र या बंधाऱ्यासाठी संत चोखा सागर धरणाचा पाणी आरक्षीत न केल्या गेल्याने शासनाचा कोटयावधी रुपयाचा खर्च व्यर्थ गेला असुन नदी काठच्या गावांना मोठ्या प्रमाणात भीषण पाणी टंचाई चा सामना करावे लागेल तसेच कोल्हापूरी बंधाऱ्यासाठी पाणी आरक्षीत करावे अन्यथा भविष्यात सिंचन तसेच पिण्याच्या पाण्यासाठी सामोरे जावे लागणार असुन आपल्या हक्काचे पाणी मिळण्यासाठी मतदार संघातील गावांनी 26 जानेवारी रोजी ग्रामसभेत संत चोखा सागर धरणातील पाणी तसेच कोल्हापूरी बंधाऱ्यासाठी आरक्षीत करून 224 गावासाठी पाणी आरक्षीत करण्यात यावे तसेच मराठवाड्यातील 92 गावांची योजना नामंजूर करण्यात यावी असा ठराव ग्रामसभेत घेण्यात येऊन मंजुर करावा तसेच ही योजना बंद करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकचळवळीची गरज असुन सर्व पक्षातील राजीकय नेत्यांनी विकासाच्या तसेच शेतकऱ्यांच्या कल्यानासाठी राजकीय जोडे बाहेर काढुन एकत्र येण्याची गरज आहे 28 जानेवारी सोमवार रोजी देऊळगावराजा येथे होणाऱ्या धडक मोर्चात ही योजना बंद करण्यासाठी देऊळगावराजा तसेच सिंदखेडराजा तालुक्यातील 218 गावातील सर्व क्षेत्रातील नागरिकांनी सहभागी व्हावे असे आव्हाहन राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे सरचिटणीस सिंदखेडराजा मतदार संघाचे प्रमुख प्रदीप बाबुराव नागरे यांनी संत चोखा सागर पाणी बचाव समिती यांच्या वतीने पत्रकार परिषदद्वारे केली आहे.


No comments:
Post a Comment