देऊळगांवराजा : प्रतिनिधी
करपेवाडी ता.पाटण येथील युवतीचा गळा चिरून निर्घृण खून केल्याची घटना दि.२२ जानेवारी रोजी सांयकाळी उघडकीस आली होती. या प्रकरणातील आरोपी अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत. त्यामुळे संतप्त देऊळगावराजा तालुका व शहर नाभिक संघटनेच्या वतीने जाहिर निषेध करीत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
देऊळगावराजा तालुका व शहर नाभिक संघटनेच्या वतीने दि.२५ जानेवारी रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करपेवाडी ता.पाटण येथील भाग्यश्री संतोष माने वय १७ ही नाभिक समाजातील महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनीवर भर दिवसा धारदार शास्त्राने अमानुषपणे वार करुन कृरपणे निर्घृण हत्या केली. या हत्येतील गुन्हेगारांच्या शोध पालिस प्रशासनाने लवकरात लवकर घेवून आरोपीला कठोर शिक्षा करावी तसेच सदर युवतीच्या घरची परीस्थिती हलाखीची असल्यामुळे शासकीय मदत व वकील देवून सदर कुटूंबाला सरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनात तालुकाध्यक्ष सुनिल शेजूळकर, शहराध्यक्ष गणेश निबांळकर, दिलीप शेजूळकर, जगदीश वखरे, राजेश पंडित, धनंजय मोहिते, संतोष वाघ, गजानन बोबडे, संदेश वाघ, गणश हिवाळे, निखिल मोहिते, रमेश मोहिते, हरी वैद्य, अमोल वैद्य, दिपक वैद्य आदी तालुक्यातील नाभिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



No comments:
Post a Comment