Thursday, January 24, 2019

मानव विकास मिशन अंतर्गत सायकल चे वाटप




देऊळगाव राजा : प्रतिनिधी
            सब पढे-सब बढे या उक्तीनुसार शिक्षणाचे सार्वत्रिकरण होण्यासाठी व मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणन्यामध्ये मानव विकास मिशन ची भूमिका मोलाची  भूमिका पार पडत आहे देऊळगावराजा शिक्षण संस्था देऊळगाव राजा द्वारा संचालित देऊळगाव राजा हायस्कूल देऊळगाव राजा येथे मानव विकास मिशन अंतर्गत  ४४  निकष पात्र  विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. जुगलकिशोरजी धन्नावत हे होते .तर कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून संस्थेचे सचिव श्री सुबोधजी मिस्त्रीकोटकर नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी श्री .जगनराव मुंडे ,पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री .अशोक जोशी सचिव सुरज गुप्ता   माजी अध्यक्ष प्रदीपजी हिवाळे, अमोल हरणे, श्री भुतेकर, श्री जाधव सर ,शाळेचे  मु.अ.एम.आर.थोरवे,प्रा.पी. डी. भौरकर, श्री.एस. एल.बोरकर आदी शिक्षक हजर हिते. याप्रसंगी संस्थेचे सचिव श्री.सुबोधजी मिस्त्रीकोटकर यांनी लाभार्थी सर्व मुलींना दररोज शाळेत येऊन यशवंत होण्याचे आवाहन केले. तर प्राचार्य श्री.एम.आर.थोरवे यांनी मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असल्याचे अभिवचन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. डी. ए.खांडेभराड यांनी केले तर सूत्रसंचालन वनश्री. जनाबापू मेहेत्रे यांनी केले. उपस्थितांचे आभार पर्यवेक्षक श्री आर.बी.कोल्हे यांनी मानले.

No comments:

Post a Comment