Thursday, January 24, 2019

भारत स्काऊट गाईड मध्ये देऊळगाव राजा हायस्कूल चे सुयश


देऊळगाव राजा : प्रतिनिधी
      भारत स्काऊट गाईड जिल्हा संस्था बुलढाणा व शिक्षण विभाग माध्यमिक यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा मेळाव्याचे आयोजन स्वामी विवेकानंद विद्यालय देऊळगाव मही या ठिकाणी दिनांक १७ ते १९जानेवारी करण्यात आले होते यामध्ये देऊळगावराजा हायस्कूल मधील स्काऊट पथकाने उत्कृष्ट सादरीकरण करत तृतीय क्रमांक पटकावला या मेळाव्यामध्ये एकूण जिल्ह्यातील ६० शाळा सहभागी झाले आहे. देऊळगाव राजा हायस्कूलमधील १९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन शारीरिक प्रात्यक्षिके ,तंबू निरीक्षण, शोभायात्रा समूहनृत्य, यामध्ये उत्कृष्ट सादरीकरण करत यश संपादन केले याबद्दल देऊळगावराजा शिक्षण संस्थेचे व्यवस्थापक ,अध्यक्ष, सचिव, संचालक व सदस्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले त्याचबरोबर प्राचार्य ,पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले याप्रसंगी प्रशिक्षक प्रेमचंद राठोड व विकास बस्सी यांनी परिश्रम घेतले

No comments:

Post a Comment