Wednesday, January 23, 2019

आमच्या संयमाचा अंत पाहू नका ! अन्यथा तीर्व आंदोलन



पाण्याच्या या गंभीर समस्यां मध्ये भाजपा आणि शिवसेनेचे मौन
 देऊळगांवराजा :  प्रतिनिधी
  मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यकमा अंतर्गत जालना जिल्ह्यातील परतुर, मंठा आणि जालना शहरासह ९२ गावांसाठी प्रस्तावित ग्रिड पाणी पुरवठा योजनेच्या विहीर खोदकामास खड़कपूर्णा प्रकाल्पच्या बुडित क्षेत्रात प्रारंभ झाला आहे. त्या कामाला बंद करण्यासाठी सर्व पक्षीय बैठक अळंद फाटया वर गणपती मंदिर परिसरात घेण्यात आली. या बैठकीत येणाºया दि.२६ जानेवारी रोजी आम्हाला पाणी द्या असा ठराव दोन्ही तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत घेणार असल्याचा ठराव मंजूर तसेच पाण्यासाठी गावागावात जनजागृती करणार येत्या दि.२८ जानेवारी रोजी बस्थानक चौका पासून तहसील कार्यलय पर्यंत मोर्चा काढून निवेदन देणार आहे. असे महत्वपूर्ण मुद्द्यावर चर्चा करुण खड़कपूर्णा प्रकाल्पच्या बुडित क्षेत्रात विहिरीच्या प्रारंभ झालेला आहे. त्या कामाला बंद करण्यात आले. विशेष पाण्याच्या या महत्वपूर्ण समस्यावर बीजेपी आणि शिवसेनेने च्या वतीने मौन धरण्यात आले होते.
                         

      पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या पुढाकारातून जालना जिल्ह्यातील परतुर, मंठा आणि जालना शहरासह ९२ गावांसाठी प्रस्तावित ग्रिड पाणी पुरवठा योजनेला मंजूरी मिळली होती.  सात्तेचा दुरुपयोग करुण मंत्री लोणीकर यांनी पाणी मराठवाड्यात नेण्चा कट रचला तसेच या योजनेसाठी संत चोखा सागर अर्थात खडकपूर्णा प्रकल्पाच्या परिसरातील ग्रामपंचायतीची हरकत नसल्याचे ठराव, वन जमिनीतून जलवाहिनीटाकण्यास ना हरकत प्रमाणपत्र राजकीय दाबाव तंत्र वापरुन करण्यात आले. म्हणून मातृतीर्थ मतदार संघातील नागरिकांनी महत्वपूर्ण भूमिका घेत दि.२३ जानेवारी रोजी सुरु असलेल्या विहिरीचे काम बंद करुण चेतावनी दिली. या वेळी काही वेळ तनाव निर्माण झल्याने पोलिसांनी मध्यस्थीथी करुण तनाव कमी केला. दि.२८ जानेवारी रोजी १२ वाजता सथानीक बस स्थानक चौका पासून तहसील कार्यलय पर्यंत मोर्चा काढून तसिलदाराला निवेदन देण्यात येणार आहे. तरी हजारोच्या संख्यने उपस्थित राहण्याचे आव्हान सर्व पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.  या बैठकीत तुकाराम खांडेभराड, देवानंद कायंदे, प्रकाश गिते, गजानन पवार, रमेश कायंदे, सौ.कल्याणी शिंगणे, सौ.रजनी चित्ते, राजीच सिरसाठ, प्रदिप नागरे, अनिल सावजी, नितीन शिंगणे, राजेश इंगळे, गजेंद्र शिंगणे, वा.द.वानखेडे, अर्पीत मिनासे, बबन डोके, राजु चित्ते,   प्रसंगी तालुक्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
                       


No comments:

Post a Comment