२२ महिलांची स्वच्छतादुत म्हणून झाली निवड!!
२५ जानेवारी ला आडगावराजा महिला ग्रामसभेचे आयोजन!!
देऊळगावराजा : प्रतिनिधी
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांची संकल्पना डोळ्यासमोर ठेऊन आपले गांव स्वच्छ व सुंदर व्हावे ही भावना समोर ठेऊन आडगावराजा येतिल २२ बचत गटांनी पुढाकार घेतला असुन यामधिल २२ बचत गटामधिल प्रतेकी एक याप्रमाणे २२ महिला स्वच्छतादुत म्हणून निवड करण्यात येऊन २५ जानेवारी रोजी गावात स्वच्छता रँली द्वारे स्वच्छतेचा जागर करण्यात येणार आहे.
आडगावराजा ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती तालुका अभियान व्यवस्थापक विक्रांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक २२ जानेवारी रोजी महिला बचत गटाच्या संघाची बैठक घेण्यात आली यावेळी विक्रांत जाधव यांनी बचत गटाच्या दशसुञी कार्यक्रम अनुषंगाने पंचायत राज संस्थेबरोबर सहभाग आसावा या दृष्टीने नियमित आरोग्याची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन केले असता या बैठकीत स्वच्छता या विषयावर चर्चा करण्यात येऊन २५ जानेवारी रोजी होणाया सकाळी १० वाजता महिला ग्रामसभा ग्रामपंचायतीने आयोजित केली असल्यामुळे या महिला ग्रामसभेत बचत गटाच्या महिलांचा पुढाकार असावा . या दृष्टीने २२ बचत गटामधुन २२ महिंला ची स्वच्छतादुत म्हणून बैठकीत निवड करण्यात आली. या स्वच्छतादुत महिला बचत गटाच्या सर्व महिला व ईतर महिलांना सोबत घेऊन महिला ग्रामसभेच्या निमित्ताने स्वच्छता रँली गावातुन काढुन स्वच्छतेचा जागर करणार आहेत या नंतर सकाळी १० वाजता होणाºया महिला ग्रामसभेस ऊपस्थित राहणार आहेत. यावेळी झालेल्या बैठकीत सरंपच सौ.कासाबाई मानसिंग कहाळे, सचिव अशोक ठाकरे ,समुह संसाधन व्यक्ती सौ.विमलबाई शिनगारे यांच्या सह बचत गटातील सर्व अध्यक्ष व सचिव ऊपस्थित होते.
२५ जानेवारी २०१९ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले या महिला सभे गावातील सर्व महिलांनी ऊपस्थित राहुन समस्यांचे निराकरण करूण घ्यावे असे आवाहन करून या स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन सरपंच सौ.कासाबाई मानसिंग कहाळे व सचिव अशोक ठाकरे यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment