देऊळगावराजा : प्रतिनिधी
राष्ट्रीय आपत्ती ठरू पाहत असलेल्या कोरोना संसगार्ला प्रतिबंध करण्यासाठी अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले. परंतु तालुक्यातील सिनगाव जाँहगिर येथील सरोदे कुटुंबात विवाह सोहळ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उत्साहाचे, आनंदाचे वातवरण होते. सर्व बडेजाव आणि मानापमान बाजूला ठेऊन अत्यंत साध्या पध्दतीने लग्नकार्य पार पाडण्यात आले. हा अभिनव लग्नसोहळा सर्व पारंपारिक शिष्टाचार व पाहुणे मंडळीची गर्दी टाळून संपन्न झाला.
रश्मी अन् अभिषेकचा विवाह सोहळा दि.१९ गुरुवारी मोठ्या दिमाखात साजरा होणार होता. परंतु कोरोनाबाबत खबरदारी घेत त्यांच्या कुटुंबियांनी स्वत: पुढाकार घेवून अत्यंत साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पाडला. विवाह सोहळ्यामुळे गेल्या काही काही दिवसांपासून दोन्ही कुटुंबात उत्साहाचे आनंदाचे वातवरण होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गडबडून न जाता, हिंमतीने त्या दोघांनी बोहल्यावर चाढण्याचा निर्णय घेतला अन् चेहºयाला मास्क लावून अंगणात आणि काही मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत यो दोघांचे शुभमंगल झाले.
सॅनेटायजरचा वापर
तालुक्यातील सिनगाव जहाँगीर येथे पार पडलेल्या या विवाह सोहळ्यात मोजक्या नातेवाइकांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे एरवी वºहाड्यांचे स्वागत करण्यासाठी त्यांच्यावर अत्तर शिंपडण्याची प्रथा आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सॅनेटायजर वापरण्यात आले. इतकेच काय तर भटजींनी सुद्धा तोंडाला मास्क लावून मंत्रोपचार करुन रेशीमगाठी बांधल्या. प्रत्येकानेच पुरुपुर काळजी घेतल्याचे चित्र पहावयास मिळाले.
मुहूर्तावरच लग्न उरकले
भारतीय संस्कृतीत विवाह सोहळा म्हणजे दोन मनांचे अन् परिवारांचे मिलन समजल्या जातो. हा मंगल अन् सुखद क्षण असतो. याप्रसंगी वधु - वरास अर्शिवाद देण्यासाठी प्रत्येकला आग्रहाचे निमंत्रण देखील देण्यात येते. तसेच पुजा आणि प्रदिपच्या विवाह सोहळ्यासाठी निमंत्रणे देण्यात आली होती. मात्र, गजानन सरोदे व अश्रूबा चोपडे यांच्या दोन्ही परिवाराने न डगमगता ठरलेल्या मुहूर्तावरच लग्न उरकण्याचा निर्णय घेतला.



No comments:
Post a Comment