देऊळगाव राजा : प्रतिनिधी
मुलींची शैक्षणिक उन्नती व्हावी ,महिला सक्षमीकरण करण्याच्या अनुषंगाने मानव विकास मिशन अंतर्गत विविध योजना राबवल्या जातात. या मध्ये मोफत अभ्यासिका वर्ग, स्पर्धा परीक्षा उपयुक्त पुस्तके ,मोफत प्रवास व ज्या ठिकाणी बसेस उपलब्ध नाही अश्या विद्यार्थीसाठी घरापासून शाळेपर्यंत येण्यासाठी मोफत सायकल वाटप उपक्रम राबवण्यात येतो.
देउळगावराजा हायस्कूलमध्ये आज निकषपात्र २२ विद्यार्थिनींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोफत सायकल वाटप करण्यात आले .याप्रसंगी देऊळगावराजा शिक्षण संस्थेचे व्यवस्थापक ओमप्रकाश धन्नावत, सचिव सुबोधजी मिस्त्रीकोटकर, गटशिक्षण आशिकरी दादाराव मुसदवाले, केंद्रप्रमुख अशोक झिने, मुख्यध्यपक डी.बी.राजपूत, उप मुख्यध्यपक पी.डी.भौरकर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. यावेळी ओमप्रकाश धन्नावत म्हणाले की,विद्यार्थिनींना सायकलमुळे वेळेची बचत होणार या वेळेचा सदुपयोग करून घेऊन अभ्यासासाठी जास्तीत जास्त वेळ देऊन यश संपादन करावे तसेच गशिअ मुसदवाले म्हणाले की मानव विकास निर्देशांक वाढवण्यासाठी मानव विकास मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना या राजकीय हस्तक्षेपाविरहीत आहे, लाभार्थी विद्यार्थिनी सायकलचा सदुपयोग घेऊन उच्च शिक्षणाबरोबर सदृढ समाज निर्मितीसाठी योगदान देण्यासाठी शुभेच्छा दिल्या. लाभार्थी विद्यार्थीनी निकिता शेळके म्हणाली की ध्येयप्राप्तीसाठी ही योजना निश्चित एका पायरीची भूमिका पार पाडेल. मानव विकास मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे शाळेतील कामकाज संतोष बोरकर करतात या प्रसंगी मुख्याध्यापक यांनी त्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन रामदास गुरव यांनी केले तर आभार निलेश सदावर्ते यांनी व्यक्त केले.



No comments:
Post a Comment