देऊळगावराजा :
मातृतीर्थ मतदार संघातील अनेक गावात पाण्याचा प्रश्न गंभीर असतांना संत चोखासागर खडकपुर्णाचे पाणी जालना जिल्ह्यातील गावांना दिले जाणार असल्याची माहिती कळताच राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आक्रमक रुप धारण करुन पत्रकार परिषदेत जालना जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी केला सत्तेचा दुरपयोग करुन खडकपूर्णा प्रकल्पातील पाणी घेण्याचा कट रचलेला आहे. त्या पाणि संदभाँत षडयंत्र केल्या जात आहे संत चोखासागरातील पाण्याचा एकही थेंब जाऊ देणार नाही असा इशारा पत्रकार परिषदेत दिल आहे .राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष डॉ.रामप्रसाद शेळके यांनी माजी आरोग्यमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या आदेशाने आंदोलनाची पुढील दिशा व दशा ठरु असा घणघणीत इशारा दिला आहे.
दि.२४ आॅगस्ट रोजी स्थानिक विश्रामगृहात राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सर्व प्रथम माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेय यांना श्रधंजलि वहन्यात आली. संत चोखासागर खडकपूर्णा धरण आहे दुसºया जिल्ह्यातील नेत्यांनी आगामी निवडणुकीत लाभ मिळवण्यासाठी संत चोखासागर प्रकल्पातून आपल्या मतदार संघात पाणी देण्याचे षडयंत्र रचण्यात येत आहे. अगोदरच मराठवाड्यात लोअर दुधना, जायकवडी तर नविन बापकळ प्रकल्प मंजुर झाले असतांना मातृतीर्थातील एकमेव संत चोखासागर खडकपूर्णा प्रकल्प आहे. त्याच पाण्यावर जालना जिल्ह्यातील पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतकºयांच्या हक्काच्या पाण्यावी डल्ला मारण्याचा घाट घातला आहे. सत्तेत राहून हे लोकशाहीची गळचेपीच करीत आहे. माजी माजी आरोग्यमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी केलेली पायाभरणी मुळे शेतकºयांसाठी हा प्रकल्प उभा केलेला आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्यात येईल एकीकडे शेतकरी ठोकशाही पद्धीने आदंोलन करणार आहे


No comments:
Post a Comment