Sunday, August 26, 2018

तालुूक्यात ठिकठिकाणी अटलजींचे अस्थिकलश दर्शन

देऊळगावराजा : माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश दि.२३ आॅगस्ट रोजी देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगावमही येथील डिग्रस चौकात तर देऊळगावराजा येथे जुनी नगर पालिका चौकात अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. याप्रसंगी सर्व पक्षीय तालुका व शहर भाजपाच्या वतीने स्थानिक जुनी नगर पालिका चौकात दि.२३ आॅगस्ट रोजी आयोजित सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत विविध राजकीय पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार आणि राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी स्व. वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील देऊळगावमही येथे डिग्रस चौकात सांयकाळी ५ वाजता माजी पंतप्रधान स्व.अटल बिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अस्थिकलशच्या दर्शनासाठी देऊळगावमही येथील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यवपारी संघटना तसेच नागरिक उपस्थित होते. तदनंतर देऊळगावराजा येथे जुनी नगर पालिका चौकात अस्थिकलश दर्शनासाठी आण्यात आले. अटल बिहारी वाजपेयी अमर रहे, जब तक सुरज चाँद रहेगा अटलजी तुम्हारा नाम रहेगाच्या घोषणा देण्यात आले. माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी केवळ राजकारणात नव्हे तर पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात आपला अमिट ठसा उमटवला होता. त्यांच्या जाण्याने देशाने तत्त्वनिष्ठ राजकारणी आणि संवेदनशील माणूस गमावल्याची भावना येथे आयोजित सर्वपक्षीय श्रध्दांजली सभेत वक्त्यांनी व्यक्त केल्या. मलकापूर ते खिरोडा अशी यात्रा करून अस्थिकलश विसर्जित करण्यात येणार असल्याचे मलकापूर मतदार संघाचे आमदार चैनसुख संचेती यानी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment