Sunday, August 26, 2018

मातृतिर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी ११ कोटी ४५ लक्ष रुपये निधी मंजुर

सिंदखेडराजा तालुक्यातील रा.मा.२२२ ते ताडशिवणी ते देवखेड, सावखेड तेजन ते पिंपरखेड बु. तसेच देऊळगावराजा तालुक्यातील असोलाफाटा  ते सिंदखेड राजा तालुकाद्दीपर्यंत रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली होती, सदर मार्गांच्या दुरुस्तीची नागरिकांकडुन सातत्याने मागणी होत होती. या मागण्यांची दखल घेत आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांनी खासदार प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शासन दरबारी सतत पाठपुरावा केला.सततच्या पाठपुराव्यामुळे सिंदखेडराजा तालुक्यातील रा.मा.२२२ ताडशिवणी ते देवखेड या रस्त्यासाठी ३६१.०२ लक्ष रूपये तर ०५वर्षे नियमित देखभाल व दुरुस्तीसाठी २५.२७ लक्ष रुपये (७.३५कि.मी.) व सावखेड तेजन ते पिंपरखेड बु. रस्त्यासाठी २४७.६२ लक्ष रुपये तर ०५ वर्षे नियमित देखभाल व दुरुस्तीसाठी १७.३३ लक्ष रुपये(४.७०कि.मी.) मंजूर झाले आहेत.तसेच देऊळगावराजा तालुक्यातील असोला फाटा ते सिदंखेड राजा तालुकाहद्दी पर्यंतचा रस्ता रुंदीकरणासाठी तसेच मजबुती कारणासाठी ४६१.७५ लक्ष रुपये तर ०५ वर्षे नियमित देखभाल व दुरुस्तीसाठी ३२.३२ लक्ष रुपये(७.००) मंजुर केले आहे.त्याबद्दल परीसरातील नागरीकांनी आ.डॉ. शशिकांत खेडेकर यांचे अभिनंदन केले,लवकरच या कामाची निविदा प्रक्रीया पुर्ण होऊन कामास सुरूवात होईल अशी महीती स्विय सहाय्यक संतोष शिगंणे यांनी दिली.

No comments:

Post a Comment