Tuesday, August 28, 2018

महेंद्रच्या कलाविष्कारातुन मराठी रंगभूमीवर मातृतिथ जिल्ह्याची उंचावली मान

अभिनयाच्या क्षेत्रात गरुड झेप घेऊन  रुपेरी पडद्यावर महेंद्र ने फुलवली  हास्याची जत्रा 
देऊळगावमही -   एकविसाव्या शतकात सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढली मात्र या स्पर्धेत टिकण्यासाठी सर्वांना जिद्द चिकाटी व मेहनत सातत्य आवश्यक असते मात्र अनेक ग्रामीण भागातील तरुणांना योग्य संधी ,मार्गदर्शन , मुलभुत सुविधांच्या अभावामुळे आजचा ग्रामीण भागातील तरुण युवक सर्वच क्षेत्रात मागे पडत आहे मात्र या सर्व संकटावर मात करत देऊळगावमही येथील अभिनय क्षेत्राची आवड असलेला  युवक महेंद्र खिलारे यांनी  देऊळगावमही ते रुपेरी पडद्यावरचा  सतरा वर्षाचा खडतर प्रवास यशस्वी रीत्या पार करून अभिनयाच्या क्षेत्रात गरुड झेप घेऊन यश संपादन केले आहे .सध्या सोनी मराठी वाहिनीवर संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेली महाराष्ट्राची हास्य जत्रा या विनोदी मालिकेत महेंद्र खिल्लारे आपल्या अभिनयाची कामगिरीतुन संपूर्ण  महाराष्ट्रातिल  रसिकांना भुरळ घातली आहे . महेंद्र खिलारे यांची   कौटुंबिक परिस्थिती जेमतेम असुन विद्यार्थी दशेत असतांना महेंद्र ला राजकारणाची आवड निर्माण झाली मात्र महेंद्र च्या आवाजावर प्रभुत्व असल्यामुळे एका दिग्दर्शकाने महेंद्र चे सुप्त गुणांना वाव देत परभणी येथील नाटयसंमेलनात पहिली संधी देण्यात आली  .महेंद्र खिलारे ला विद्यार्थी दशेपासून  लिखाण व वाचनाची आवड असल्यामुळे त्यांनी एलएलबी तसेच नाट्यशास्त्र्  पदवी घेऊन दहा नाटक व चार एकांकिका आत्तापर्यत लीहील्या आहे .महेंद्र खिलारे यांनी जिद्द चिकाटी व मेहनत व सातत्य ठेऊन रुपेरी पडद्यावर आपल्या कला गुणांना वाव देत अनेक एकांकिका , मराठी नाटक ,मालक , अनेक अनेक चित्रपटामध्ये  अनेक दिगग्ज कलाकारांसोबत काम केले असुन महेंद्र खिल्लारे च्या रूपाने मातृतिर्थ जिल्ह्याची मान मराठी रंगभूमीवर नक्कीच उंचावली आहे.
...........................................................................................................................

 महेंद्र खिलारे यांनी मराठी रंगभूमी वर सतरा वर्षात 50 एकांकीका , 25 मराठी नाटिका , मराठी मालिका व चित्रपटात काम केले आहे त्यांनी इच्छा माझी पुरी , अस्मिता , ही चाल तरु तरु ,चटक , स्टेचु ऑफ लिबर्टी , अशा विविध नामांकित नाटिका , चित्रपट मध्ये मराठी रंगभूमी वरील नामांकित कलाकार दिग्दर्शक ,निर्माते सोबत काम केले असून त्यांना झी नामांकन तसेच विविध सामाजिक संस्था कडून विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

.................................................................................................................................

रुणांनी आवडत्या क्षेत्रात प्रामाणिक काम करा - महेंद्र खिल्लारे
सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढल्यामुळे अनेक वेळा तरुणांना अपयश येते मात्र खचून न जाता आजच्या तरुण युवकांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात जिद्द चिकाटी मेहनत व सातत्य ,प्रामाणिकपणा या चतु सूत्रीचा अवलंब करून युवकांनी यश संपादन करावे

.................................................................................................................................     


No comments:

Post a Comment