देऊळगाव मही, नाशिक जिल्ह्यातील देशवंडी या गांवात वामन तबाजी कर्डक यांचा गरीब कुटुंबात जन्म झाला. गरीबी मुळे शिक्षणाची पाटी कोरी.पत्नी आणि मुलीच्या निधनामुळे दादा आई सोबत मुंबईला गेले.मिळेल ते काम करत पोटाची खळगी भरत जगत होते.देहलवी नावाच्या शिक्षकाने अक्षरं ओळख करुन दिली आणि वामनदादा ची गाडी आंबेडकरी चळवळीत सुसाट निघाली.गरीब वर्गाचे हाल पाहतांना गरीबीच्या प्रश्नावर जाब विचारायला लागले "सांगा आम्हाला टाटा बिर्ला बाटा कुठ हाय हो/
सांगा धनाचा साठा आणि आमचा वाटा कुठ हाय हो//"
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाच्या उद्धारासाठी मानवतेच्या धर्माची पुजा करण्यास सांगितली तो धर्म वामनदादानी शब्दांतून उभा केला. "माणसां ईथे मी तुझे गित गावे / असे गित गावे तुझे हित व्हावे / वामनदादाची लेखणी अंगार ओकत खेड्यापाड्याच्यां माणसाला जागवत होती, स्वाभिमानाने उभी करत होती.बाबासाहेबांचा क्रांतीकारी वारसा चालवित होती.आपल्या शब्दातुन तुफानातील हा दिवा आंबेडकरी चळवळ प्रखर करत होता.सामान्यांचा आवाज होता ,म्हणून आंबेडकरी चळवळीचा सुवर्ण काळ ही ओळख वामनदादा कर्डक यांची आहे.असे प्रतिपादन चोखासागर नामकरणाचे शिल्पकार प्रा. कमलेश खिल्लारे यांनी साटेगांवसांवगी येथे वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त केले .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी झोटे हे होते तर प्रमुख उपस्थिती निलेश बंगाळे, बाबासाहेब साळवे यांची होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.निलेश बंगाळे आणि बाबासाहेब साळवे यांनीही या वेळी आपले विचार व्यक्त केले.पुढे बोलतांना प्रा कमलेश खिल्लारे म्हणाले की संपूर्ण समाज हेचे वामनदादा आपले कुटुंब मानत होते म्हणून ते समाजाच्या साठी जगले स्वतःसाठी नाही. आम्ही मात्र जयंती पुण्यतिथी ला हारतुरे आणि ढोंगी भाषणं करतो .फुले शाहू आंबेडकर सांगतो . आचरणात मात्र शन्य असतो ? समाजाच्या प्रगतीसाठी आपलं नेतृत्व करणारा हा आचरण युक्त राहिलं तेव्हाच समाजाची प्रगती होईल. अन्यथा "बाबा तु गेल्यानंतर झुकला समाज सारा/बाबा तु गेल्यानंतर विकला समाज सारा/नुसताच भाषणातून भूंकला समाज सारा /अरे पोट ज्याची भरली ते ते पसार झाले/भिमा तुझ्या रथाचे घोडे पसार झाले/." समाजामधे काय चांगलं आहे काय वाईट हे ओळखण्याचे सामर्थ्य वाचनातून येते त्यामुळे समाजात वाचन वाढलं पाहिजे असे सांगितले.या बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार युवराज झोटे यांनी मानले.या वेळी देवानंद झोटे बबनराव झोटे, माणिकराव यांची प्रमुख उपस्थिती होती.महिला व युवा वर्ग यांच्या भरघोस प्रतिसाद मुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आंबेडकरी युवा संघटनेने परिश्रम घेतले.


No comments:
Post a Comment