शिवसंग्राम संघटनेच्या प्रशासनाला इशारा
देऊळगावराजा : मातृतीर्था पाणी जालण्यात पळविण्याचा घाट प्रशासकीय स्थरावर सुरु असून,जीवन प्राधिकरण जालना या कार्यालयाने सिंदखेड राजा व देऊळगांव राजा तालुक्यातील ग्रामपंचायतचे नाहरकत मिळवून देण्यासाठी पंचयात समितिला साकडे घातले आहे.मात्र खडक पूर्णा धरणातील पाणी इतर जिल्ह्यात पळविल्यास शिवसंग्राम संघटनेच्या वतीने जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी यांना शिवसंग्राम संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाचे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या सुचने नुसार खडकपूर्णा प्रकल्पातुन जालना जिल्ह्यातील परतुर,मंठा व जालना तालुक्यातील 92 गांवाकारिता ग्रीड पाणी पुरवठा योजनेचे अंदाज पत्रक व आराखड़े तयार करण्याचे काम प्रगती पतावर आहे.या पाइप लाईन च्या मार्गात देऊळगांव राजा तालुक्यातील मेहुनाराजा,जवळखेड,दगडवाडी,असो ला ज.,आळंद व बामखेड ही गावे तसेच सिंदखेड राजा तालुक्यातील उगला,पिंपळखुटा बू.,व सोनुशी ही गावे येत आहे.सदर पाइप लाइन उपरोक्त गावांच्या वनक्षेत्रातुन टाकण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्राची मागणी जीवन प्राधिकरण विभागाने पंचायत समिति देऊळगांव राजा व सिंदखेड राजा यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. मात्र जालना जिल्ह्यात पाणी पळविण्याचे हे छुपे षडयंत्र शिवसंग्राम संघटनेचे पदाधिकारी यांना समजताच, जिल्ह्यातील हक्काचे पाणी इतर जिल्ह्यात नेऊ नये.जिल्ह्यातील महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून संत चोखा सागर खडक पूर्णा धरणाकडे बगीतल्या जाते.तर मातृतीर्थ जिल्ह्यातील बुलढाणा,देऊळगांव राजा व सिंदखेड राजा शहरांसाठी या प्रकल्पातून पाण्याचे आरक्षण आहे.सदर खडक पूर्णा प्रकल्पासाठी देऊळगांव राजा तालुक्यातील शेत जमीन गेली असून शेकडो शेतकरी भूमिहिन झाले आहे.तालुक्यातील आरक्षित असणारे अनेक गावे पाण्यपासुन अजुन देखील वंचित आहे.असे असतांनी ना.पुरवठा मंत्री यांनी स्वतः च्या जिल्ह्यात पाणी नेण्याचा घाट सुरु केला आहे.प्रशासनाने देऊळगांव राजा व सिंदखेड राजा येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व शेत जमिनीचा प्रश्न लक्षात घेता सदर पाईप लाइनसाठी जीवन प्राधिकरण यांना नाहरकत प्रमाण पत्र देण्यात येऊ नये,अशी मागणी एका निवेदनाद्वारे शिवसंग्राम चे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे व तालुका संघटक जाहिर खान पठाण यांनी तहसीलदार दीपक बाजड यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांचा कडे केली आहे.अन्यथा शिवसंग्राम संघटनेच्या वतीने जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.

No comments:
Post a Comment