Friday, September 28, 2018

पाडळी शिंदे येथे कायम स्वरूपी तलाठी द्या


पाडळी शिंदे : (प्रतिनिधी) 
       येथील तलाठी यांची बदली झाल्याने गावातील नागरिकांची शेतीउपयोगी दाखले, वृद्ध, निराधार, शालेय विद्यार्थी यांना शालेय उपयोगी दाखले तलाठी नसल्याने गैरसोय होत असुनयेथील तलाठी यांचा कारभार प्रभारी असून कायम  स्वरूपी तलाठी द्या अशी मांगणीआज 26 सप्टेंबर २०१८ रोजी देऊळगाव राजाचे तहसिलदार दीपक बाजड यांच्या कडे एका निवेदनाद्वारे   ग्रामस्थांनी केली.                               
            देऊळगाव राजा तालुक्यात येणाऱ्या पाडळी शिंदे येथील तलाठी कु.एम.के.सोनवणे यांची बदली झाल्यानंतर आज जवळपास दोन महिन्या पासून येथील अतिरिक्त प्रभार तलाठी तायडे यांच्याकडे असून ते मुख्यालयी येत नसून ग्रामस्थांना देऊळगाव मही येथे जाऊन कागद पत्रे आणावी लागत असून वृद्ध,निराधार,शालेय विद्यार्थी,तसेच शेतकरी यांची गैरसोय होत असून रोज ४० रूपये भाडे खर्चून व अमूल्य असा वेळ खर्चून देऊळगाव मही येथे जावे लागते.या सर्व प्रकाराला कंटाळुन पाडळी शिंदे येथील ग्रामस्थानी परीणामी आज 26 सप्टेंबर २०१८ रोजी तहसिलदार यांना लेखी निवेदन देऊन येथे कायम स्वरूपी तलाठी देऊन सोमवार व गुरुवार गावातील तलाठी कार्यालयात हजर राहावा अशी मांगणी तहसीलदार दीपक बाजड देऊळगाव राजा यांच्याकडे केली असून निवेदनावर शिवसेना विभाग प्रमुख स्वप्निल शिंदे, युवा सेना शाखा प्रमुख रमेश किसन शिंदे,सुधाकर शेळके शिवसेना नेते. राजू शेळके.रामेश्वर पिछोरे.आधीच्या निवेदनावर साह्य आहेत निवेदन देतेवेळी मुरलीधर जाधव उपसरपंच हे हजर होते तरी संबंधितांनी याकडे लक्ष्य देऊन तात्काळ कायम स्वरूपी तलाठी द्यावा अशी मागणी पाडळी शिंदे येथील समस्त गावकर्यानी केली आहे.

No comments:

Post a Comment