देऊळगांवमही : (प्रतिनीधी)
ग्रामपंचायतचा उपसरपंच व रोजगार सेवक अशा दोन्ही पदांवर काम करतांना आपल्या पदाचा गैरफायदा घेणार्या सदर व्यक्तीची चौकशी करून त्याचेविरूध्द तात्काळ कारवाई करावी अशी मागणी शिवणी आरमाळ येथील तेजराव साहेबराव सोनपसारे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार, दे.राजा यांचेकडे केली आहे.
निवेदनात नमूद आहे की, मौजे शिवणी आरमाळ येथील रोजगार सेवक दिपक ज्ञानबा सोनपसारे हे येथील उपसरपंच पदावर कार्यरत आहेत. रोजगार सेवकाला नियमानुसार कोणतेही पदाधिकारी पद भूषविता येत नसतांना दोन्ही पदावर ते कार्य करीत असतांना आपल्या पदाचा गैरफायदा घेत आहेत. कागदोपत्री योजना राबविणे, मजुरांचे पगार न काढणे, माझी तक्रार करू नका नाहीतर तुमचे घरकुल रद्द करू शकतो तसेच मजुरांचा पगार काढणे माझ्या हातात आहे आदी प्रकारे अडवणूक केली जात आहे. तरी दिपक ज्ञानबा सोनपसारे यांच्या कामाची चौकशी करून तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.


No comments:
Post a Comment