Saturday, September 29, 2018

जुन्या पेन्शनसाठी ठाणे ते मुंबई भव्य पेन्शनदिंडीत सहभागी व्हा. - गणेश मुंडे

देऊळगांवराजा : (प्रतिनिधी)
                राज्यातील सरकारी तसेच निम सरकारी कर्मचाऱ्यांची २००५ नंतर लागू करण्यात आलेली पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने दि.२ ऑक्टोंबर गांधी जयंती निमित्त दिंडी स्वरूपाने मंत्रालयावर धडकणार आहे, या दिंडीत सहभगी राहनयाचे आव्हान गणेश मुंडे राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन यानी केले आहे.
           जुनी पेन्शन हा या तरुण कर्मचाऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे,राज्यातील वेगवेगळ्या विभागातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी या दिंडीत सहभागी होणार आहे,या दिंडी द्वारे शासनाकडे संघटना खालील प्रमुख मागण्या  करणार आहे.नवीन  अन्यायकारक योजना बंद करून १९८२ ची जुनी पेन्शन योजना सरसगट जशी च्या तशी लागू करावी, केंद्रशासनाच्या ५ में २००९ च्या शासननिर्णयांनुसार नोव्हेबर २००५ नंतर मयत झालेल्या कर्मचार्याना जुन्या पेन्शनचा त्वरित लाभ मिळावा,1 नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर मृत्यू आणि सेवा निवृति सेवा उत्पादनाचा (ग्रॅज्यूइटी) लाभ देण्यात यावा अशा अनेक मागण्या सरकार दरबारी मांडणार आहोत आपण आपले कर्तव्य समजून या दिंडीत सहभागी व्होवे कोणी म्हणण्याची वाट पाहू नये, कारण प्रत्येकाला जुनी पेन्शन हवी आहे, मंग विचार काय करता चला पेन्शन दिंडीत जाऊया आपला हक्क मिळवू या, पेन्शन दिंडीत सर्व जिल्हातुन सर्व विभागाचे कर्मचारी बांधव हजारो च्या संख्येने सहभागी होणार आहेत, आपण आपल्या लढ्यासाठी सज्ज व्हा असे आव्हान  जुनी पेन्शन हक्क सँघटनेचे राज्य समनवय्क प्रा. गणेश मुंडे तसेच बुलडाणा जिल्हा अध्यक्ष  नंदू सुसर,कार्याध्यक्ष शरद नागरे व नितीन भुतेकर,  नितीन मेरत, संदीप डिघोळे इतर पदाधिकायांनी दिली.

No comments:

Post a Comment