देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
पर्यावरण संवर्धनासह आपले स्वास्थ्य निरोगी ठेवण्यासाठी सायकल रॅली काढून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे कार्य स्थानिक परम स्प्लेंडर क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी केले. जनसामान्यांचे आरोग्य सह पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आयोजित या सायकल रॅलीचे नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
स्थानिक सिव्हिल कॉलनी येथील परम क्लासेस येथून निघालेल्या या रॅलीचे उद््घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रामप्रसाद शेळके व भाजप नेते डॉ. रामदास शिंदे यांनी केले. तर काँग्रेस नेते प्रा. सुभाष दराडे यांनी हिरवी झेंडी दाखवून सायकल रॅलीचा शुभारंभ केला. याप्रसंगी नगर उपाध्यक्ष पवन झोरे, पालिका गटनेते नंदन खेडेकर, यांची प्रमुख उपस्थिती होती. पर्यावरण राखण्यासाठी विविध स्लोगन असलेले फलक हातात घेऊन निघालेल्या या पर्यावरण जनजागृती सायकल रॅली शहरातील विविध मार्गाने मार्गक्रमण करत असताना नागरिकांचे लक्ष वेधून गेली. तत्पूर्वी परमचे संचालक प्रा. जयवंत देशमुख यांनी सायकल वापरण्याचे फायदे निरोगी जीवन इंधनाची बचत व पर्यावरण संवर्धनाविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रल्हाद देशमुख यांनी केले. याप्रसंगी प्रमोद वैराळकर नगरसेवक वसंत आप्पा खुळे, पत्रकार राजेश पंडित यांच्यासह प्राध्यापक वृंद यांची उपस्थिती होती. या रॅलीत परिसरातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला.



No comments:
Post a Comment