Monday, September 17, 2018

बालाजी नगरीत पोलिसांचे पथसंचलन

देऊळगावराजा : (प्रतिनिधी)          
      सद्या सुरु असलेला गणेशोत्सव व आगामी काळात येणाºया मोहरम या सण-उत्सवाच्या पार्श्वभुमिवर दि.१७ सप्टेंबर रोजी श्री बालाजी महाराजांच्या पुण्य नगरीत पोलिसांच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गावरुन पथसंचलन घेण्यात आले. 
      भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेल्या गणेशोत्सवाला मोठ्या धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. देऊळगावराजा शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा केल्या जात आहे. तसेच मोहरम उत्सव अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे. या उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था आबाधित राहावी, यासाठी पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या आदेशान्वये  दि.१७ सप्टेंबर रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी भिमानंद नलावडे, ठाणेदार सारंग नवलकार यांच्या नेतृत्वात स्थानिक पोलीस स्टेशन पासुन या पथसंचलनाला सुरुवात झाली. बस स्थापक चौक, संतोष चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, महाद्वार चौक, जुनी नगर पालिका चौक, खुट पार्इंट, जालना रोड तर शहरातील प्रमुख मार्गावरुन फिरुन पोलीस स्टेशन समोर समारोप करण्यात आला.      
          

No comments:

Post a Comment