Sunday, September 16, 2018

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारसाठी उद्या कार्यशाळा

देऊळगाव राजा : (प्रतिनिधी)
      भारतीय जैन संघटना व शासनाने जिल्ह्यात मार्च महिन्यापासून सुजलाम् सुफलाम् अभियानास सुरुवात केली आहे. याच अभियानांतर्गत गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार कार्यक्रमाची लवकरच सुरुवात होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील कामाचे नियोजन करण्यासाठी १८ सप्टेंबरला रोजी न.प. टाऊन हॉल येथे दुपारी १ वाजता कार्यशाळा पार पडणार आहे..
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व बीजेएसचे जिल्हा समन्वयक राजेश देशलहरा मार्गदर्शन करणार आहेत. तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, पोलीस पाटील, विविध ग्राम स्तरावरील समित्यांचे अध्यक्ष सदस्य, जलयुक्त शिवार मोहिमेचे काम करणाऱ्या खाजगी यंत्रणांचे प्रमुख व भारतीय जैन संघटनेचे तालुक्यातील पदाधिकारी व सदस्यांनी कार्यशाळेला उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार दीपक बाजड व प्रभारी गटविकास अधिकारी बी.डब्ल्यू. चव्हाण यांनी केले आहे. कार्यशाळेत तालुक्यात या योजनेतून कोणकोणती कामे करावयाची आहे याची निश्चिती करण्याची प्रक्रिया सुरू करून शिवार फेरीनंतर कोणतेच काम सुटणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे..

No comments:

Post a Comment