Tuesday, September 18, 2018

लोकसभा युवक कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी मनोज कायंदे

देऊळगावमही येथे जल्लोषात स्वागत 
         देऊळगावराजा : (प्रतिनिधी) 
         बुलडाणा लोकसभा युवक कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी मनोज कायंदे हे अ‍ॅपद्वारे झालेल्या मतदान पद्धतीने विजयी झाले. दुसºयांदा विजयी होणारे ते पहिले जिल्हाध्यक्ष ठरले आहे. युवक कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी मनोज कायंदे यांची निवड होताच देऊळगावमही येथील कॉग्रेस कार्यकर्ते नाजीम शेख यांच्या  नेतृत्वात स्वगत करुन जल्लोष साजरा केला.
          अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रत्येक युवकाला नेतृत्व करण्याची संधी मिळावी यासाठी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून पक्षांतर्गत पदाधिकाºयांची निवडणूक हायटेक पद्धतीने होत आहे. सभासदांना एका अ‍ॅपद्वारे मतदान करावे लागले. युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, प्रदेश महासचिव, जिल्हाध्यक्ष, जिल्हा महासचिव व विधानसभा अध्यक्ष या पदांसाठी दि.९, १० व ११ सप्टेंबरला तदान घेण्यात आले. गत सहा महिन्यांपासूनच युवक कॉंग्रेसची सदस्य नोंदणी सुरू होती. बुलडाणा लोकसभा युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्षपदाकरिता जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते मनोज कायंदे, राजकुमारी चौहाण यांच्यासह ७ उमेदवार रिंगणात होते. मनोज कायंदे यांनी दोन हजारांहून अधिक मते मिळवत विजय संपादन केला. त्यांच्या युवक कॉग्रोच्या जिल्हाध्यक्षपदी विजया होताच ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला आहे. सर्व प्रथम देऊळगावराज तालुक्यातील देऊळगावमही येथे भारतीय राष्ट्रीय कॉगं्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते नाजीम शेख यांच्या नेतृत्वात बस स्थानक चौकात शेख कलीम, अनिल शिंदे, तुकाराम महाराज, शेख शकील, मोहसीन शेख, वसीम परवेज, असलम कुरेशी आदी कार्यकर्त्यांनी स्वगत व अतिष बाजी करुन जल्लोष साजरा केला.     

No comments:

Post a Comment