अखिल महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या तालुकाध्यक्षपदी सुनील शेजुळकर यांची फेरनिवड, उपाध्यक्षपदी कैलास राऊत तर सचिव पदी अमोल बोबडे यांची अविरोध निवड करण्यात आली.
येथील शिरोमणी संतसेना महाराज मंदिरात अखिल महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष दामोदर बिडवे जिल्हाध्यक्ष गजानन झगरे यांच्या नेतृत्वात नाभिक समाज संघटनेची बैठक संपन्न झाली सदर बैठकीत चर्चे अंती नाभिक महामंडळाच्या तालुकाध्यक्षपदी सुनील शेजुळकर यांची फेरनिवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी कैलास राऊत, राजेश राऊत व सचिवपदी अमोल बोबडे यांची अविरोध निवड करण्यात आली सहसचिवपदी ज्ञानेश्वर बोबडे कोषाध्यक्षपदी राजेश जाधव सहकोषाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर वाघ यांची नियुक्ती करण्यात आली इतर कार्यकारिणीमध्ये ज्ञानेश्वर वैद्य, ज्ञानेश्वर जाधव, रतन सुरोशे, विष्णु राऊत, योगेश सोनवणे, रवी जाधव, यांची सदस्यपदी निवड करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत सेना महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले याप्रसंगी अविनाश भुतेकर, दिलीप शेजुळकर, गणेश निंबाळकर,कैलास वाघ, संदीप राऊत, गजूभाऊ बोबडे, राजेश पंडित, रविंद्र मोहिते, हरिभाऊ मोहिते, सुधाकर वरपे,कैलास निंबाळकर यांच्यासह समाज बांधवांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दिलीप शेजुळ कर यांनी व्यक्त केले.


No comments:
Post a Comment