मोहरम निमित्त सर्वधर्म समाजबांधवांसाठी सरबत वाटप
देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
इस्लाम धर्मावर विश्वास करणाºयांसाठी मोहरम हा प्रमुख महिना आहे. या महिन्याची विशेषता व महत्व आहे. इस्लाम धर्म वाईट प्रवृत्तीला कधीही थारा देत नाही तर अशी शिकवणही देत नाही सर्व धर्मा बद्दल अतूट आस्था व एकतेचे प्रतिक इस्लाम धर्म आहे असे प्रतिपादन मौलाना अशरफ रजा यांनी केले.
येथील बस स्थानक चौकात एकता आॅटो युनियनच्या वतीने सर्वधर्म समाज बांधवांसाठी सरबत वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्््घाटन आमदार डॉ शशिकांत खेडेकर, ठाणेदार सारंग नवलकार, डॉ. रामदास शिंदे, देवानंद कायंदे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी दर्गा मस्जिदचे इमाम हाफिज मौलाना अशरफ रजा बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पवित्र ग्रंथ कुराण पठण आणि फातेआ झाले. मोहरम सण व इमाम हसन हुसेन यांच्या बलिदाना विषयी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मौलाना अशरफ यांनी एकमेकांविरुद्ध द्वेष भावना न ठेवता सदभाव निर्माण करण्याची शिकवण इस्लाम धमार्ने दिल्याचे सांगितले. याप्रसंगी आमदार डॉ खेडेकर, कायंदे, शिंदे व ठाणेदार नवलकार यांनी मोहरमच्या सदिच्छा दिल्या. याप्रसंगी काँग्रेस नेते सुभाष दराडे, अनिल सावजी, नगरसेवक हनीफ शहा, इस्माईल बागवान, हाजी म. सिद्दीक, गौस बागवान, नंदन खेडेकर, सय्यद निसार, विनोद कोल, गोपाल व्यास, डॉ. सुनील कायंदे, सलीम खान, गणेश सवडे, हाजी अलताफ कोटकर, सुनिल शेजुळकर, पत्रकार यांच्यासह सर्व धर्म समाज बांधवांची उपस्थिती होती. एकता आॅटो युनियनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एकता आॅटो युनियनचे अजमत खान, लतीफ भंडारी, हमीद खान, म अकबरखान, शब्बीर पठाण, शेख काझिम, आझाद खान, तौफिक खान आदी सदस्यांनी पुढाकार घेतला होता.

No comments:
Post a Comment