Wednesday, September 26, 2018

पोलीस वसाहतेतील गणपती विसर्जन ११ व्या दिवशी

 पोलीस यंत्रणेच्या श्रद्धेला सलाम
देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
           १० दिवसीय गणपती उत्सवाची पारंपरीक पद्धतीने सुरु राहावे कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने २४ तास नजर ठेवण्यात येते. परंतु १० दिवस २४ तास सेवेत असणाºयां स्थानिक पोलीस वसाहतीमध्ये मात्र ११ व्या दिवसी गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या अश्या गजरात लाडक्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.
        पोलीस प्रशासनाच्या वतीने गणपती स्थापने पासून ते  विसर्जन पर्यंत शहरात बंदोबस्त करतात कायद्या व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी आहोरात्र आपला कर्तव्य बजवतात त्यांनी सण असो की कोणता मोठा उत्साहा असो त्यांना नागरिकांची रक्षण करण्यासाठी तत्पर राहातात. मात्र शहर शांत झाल्यानंतर पोलिसांनी आपल्या वसाहतीत स्थापना केलेल्या गणरायाची दि.२४ सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली. पोलिस यंत्रणेच्या या श्रद्धेला जनतेने खरोखरच सलाम कराव्यास पाहिजे याप्रसंगी स्थानिक पोलिस स्टेशनचे ठाणेदार सारंग नवलकार व कर्मचारी उपस्थित होते.   
    

No comments:

Post a Comment