देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला सलंग्न समर्थ कृषि महविद्यालय देऊळगांवराजा येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सन्मान करून उत्साहात साजरा केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन महाविद्यालयाचे उपाध्यक्ष अर्जुनराव डोईफोडे, प्रमुख उपस्थिती म्हणुन प्राचार्य नितीन मेहेत्रे, प्रा. अश्विनी जाधव, प्रा. सिताबाई ढाकणे, प्रा. किरण गिरी, प्रा. नारायण बोडखे, प्रा. देवानंद नागरे, प्रा. सचिन सोळंकी, प्रा. विलास सातपुते, प्रा. अरविंद देशमाने हे होते. प्रसंगी प्राचार्य नितीन मेहेत्रे यांनी उपस्थितांना संबोधित करतांना शिक्षण घेत असतांना आलेल्या अडचणींचा सकारात्मक विचार करून आपले शिक्षण अखंडीत सुरू ठेवुन त्यापासुन आपल्या समाजाला फायदा झाला पाहीजे अशी अपेक्षा व्यक्त केली. शिक्षकांबद्दल कृतज्ञता म्हणुन विद्यार्थी दिपक लोखंडे, प्रणव धुपाळ व पुनम आघाव यांनी आपले विचार व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन वैष्णवी शिंगणे हीने केले, सदर कार्यक्रमास विद्यार्थी समाधान सानप, हर्षल काळे, अनिकेत वाघ, स्वप्नील मुंढे, पवन मुंढे, उमेश डुकरे, गोपाळ पाटील, सचिन काळे, अमित दाबेकर, दिपक लोखंडे, विद्यार्थीनी कोमल इघारे, वैशाली शिंदे, प्राजक्ता वाघमारे, रूचा भोपळे, कोमल देशमुख, शितल देशमुख, स्वाती आवारे, स्नेहल प-हाड, सायली काकडे, रेवती घायाळ, विद्यार्थी व विद्यार्थींनी मोठया संख्येने उपस्थित होते.


No comments:
Post a Comment