Saturday, September 8, 2018

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ पेट्रोलपंपावर दिले गुलाबपुष्प


देऊळगाव मही, (प्रतिनिधी) 
       इंधन दरवाढीने जनता त्रस्त झाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने ७ सप्टेंबरला पेट्रोलपंपावर गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी करण्यात आली. तसेच शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. 
        लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी मोठमोठी आश्वासने दिली. 'अच्छे दिन' आणण्याऐवजी या सरकारने 'बुरे दिन' आणले आहेत. यावेळी पंचायत समिती सभापती कल्याणी शिंगणे यांनी तीव्र शब्दांत सरकारवर टीकास्त्र सोडले. सरकारी तेल कंपन्यांनी सलग १३ दिवस पेट्रोल-डिझेलची दरवाढ केली. बुधवारी दर स्थिर ठेवले. त्यामुळे आता दर कमी होतील, अशी आशा होती. पण महागाईची पर्वा न करता पुन्हा गुरुवारी पेट्रोल २० व डिझेलच्या दरात २२ पैसे प्रति लिटर वाढ करण्यात आली. यामुळे इंधनाच्या दरांनी पुन्हा नवा उच्चांक गाठला. त्यामुळे सरकारचा गांधीगिरी पद्धतीने निषेध नोंदविण्यात आल्याचे शिंगणे म्हणाल्या. या आंदोलनात तालुकाध्यक्ष राजू शिरसाठ, युवा तालुकाध्यक्ष गजानन चेके, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सय्यद सईद, बाजार समितीचे सदस्य मन्नान पठाण, गजेंद्र शिंगणे, रवींद्र इंगळे, सुभाष शिंगणे, बळीराम शिंगणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
  


No comments:

Post a Comment