डॉक्टर असोसिएशन कडून तहसीलदाराला निवेदन
देऊळगावराजा : (प्रतिनिधी) दि.६ सप्टेंबर रोजी बुलडाणा येथील खाजगी रुग्णालयातील डॉक्टर जयसिंग मेहर रुग्णाना तपासणी करतांना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला हल्ल्याचे निषेधार्ह शहरातील खासगी हॉस्पिटल शुक्रवार ७ व शनिवार ८ सप्टेंबर रोजी बंद ठेवण्याचा निर्णय देऊळगावराजा डॉक्टरांच्या असोसिएशन दि. ६ सप्टेंबर रोजी तातडीच्या बैठकीत घेतला. तसेच दि.७ सप्टेंबर रोजी तहसीलदाराला निवेदन देवून आंदोलन केला.
गेल्या अनेक महिन्या पासून डॉक्टरांवर प्राणघातक हल्ले होत आहे. अशीच एक घटना बुलडाणा येथे दि.६ सप्टेंबर रोजी घडली. खाजगी रुग्णालयातील डॉक्टर जयसिंग मेहर रुग्णाना तपासणी करतांना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला त्यांच्या उजव्या डोळ्याला आणि चेहºयावर गंभीर दुखापत होवून फॅकचर सुद्धा झालेले आहे. हल्ल्याचे निषेधार्ह शहरातील खासगी हॉस्पिटल दोन दिवस बंद करण्याच्या निर्णय घेण्यात आला डॉक्टर असोसिएशनच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन दिले. या निवेदनावर डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.रामदास शिंदे, डॉ.बैरागी, डॉ.खरात, डॉ.मुंढे, डॉ.सुनिल कायंदे, डॉ.काबरा, डॉ.अतुल गिते, डॉ.डोईफोडे, डॉ.अशुतोश सोलंकी, डॉ.संजय नागरे, डॉ.मिनासे आदी डॉक्टरांच्या सह्या आहेत.


No comments:
Post a Comment