देऊळगावराजा (प्रतिनिधी)
नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्र. २ मध्ये वास्तव्यास असणाऱ्या अनेक नागरिकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाप्रमाणे योजनेत समाविष्ट न केल्याने ते नागरिक लाभापासून वंचित असल्याने जिल्हा पुरवठा विभाग व तालुका पुरवठा विभाग यांनी संयुक्तपणे विशेष मोहिम राबवून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून जागेवरच शिधापत्रिका, जिर्ण शिधापत्रिका, विभक्त शिधापत्रिका विवरणाचे काम करण्याची मागणी या प्रभागाच्या नगरसेविका विद्या कासारे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.
निवेदनात नमुद केले आहे की, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर प्रभाग क्र २ मधील प्रलंबीत लाभार्थ्यांचे नाव समाविष्ट करून त्यांना त्याचा लाभ देण्यात यावा. या बरोबरच अनेक शिधापत्रिकाधारकांच्या शिधा पत्रिका जुन्या झाल्याने त्या फाटलेल्या आहेत. त्या बदलून द्याव्या, जे कुटुंब यापूर्वी एकत्रित होते.मात्र ते काही कारणामुळे विभक्त झालेले आहे अशा कुटुंबाच्या शिधापत्रिका विभक्त करून मिळाव्यात. या प्रभागातील बहुतेक नागरिक हे मोलमजूरी करून उदरनिर्वाह चालवितात. त्यामुळे त्यांचे शिधापत्रिकेचे काम एकाचवेळी होण्याकरीता पुरवठा विभागाने विशेष कार्यक्रम राबवून प्रभागातच लाभार्थ्यांना याचा लाभ द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे..


No comments:
Post a Comment